भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष

भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष

छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन

सिडको: दिलीपराज सोनार
ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी अखेर राज्य मंत्रिमंडळात दमदार कमबॅक करत अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे मंत्री म्हणून शपथ घेतली. धनंजय मुंडे यांच्याकडील हे खाते भुजबळांकडे देण्यात आले आहे. त्यांच्या या पुनरागमनामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

राजभवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्या शपथविधीनंतर भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. ढोल-ताशे, फटाके आणि गुलाल उधळत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.

भुजबळ समर्थकांची भुजबळ फार्मवर मोठी गर्दी पाहायला मिळाली. “छगन भुजबळ जिंदाबाद”, “आपला मंत्री परत आला” अशा घोषणा परिसरात घुमत होत्या.आगामी काळात होणा-या मनपा निवडणूका तसेच सिंहस्थ कुंभमेळा लक्षात घेऊन ना छगनभुजबळ यांना नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्याची समर्थकांसह कार्यकर्त्यांनी मागणी केली जात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *