नाशिक: प्रतिनिधी
अखिल भारतीय नाट्य परिषद नाशिक शाखा आणि नाट्यसेवा यांच्या विद्यमाने ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांचा 12 हाजार पाचशे प्रयोग झाल्याबद्दल उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते काल(दि.4) रविवार रोजी कालिदास कला मंदिर येथे सत्कार करण्यात आला.यावेळी अभिनेत्री वर्षा उसगावकर , नाट्य परिषद नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा .रवींद्र कदम,प्रमुख कार्यवाह सुनील ढगे,नाट्य सेवाचे राजेंद्र जाधव, जगन्नाथ कहाणे,स्वप्नील तोरणे, विजय शिंगणे,सुनील परमार,प्रविण कांबळे,आदिती पंचाक्षरी,विनोद राठोड,राजेश जाधव उपस्थित होते.