उत्तर महाराष्ट्र

अडीच महिन्याच्या बाळासह आमदार विधानभवनात

अडीच महिन्याच्या बाळासह आमदार विधानभवनात

नाशिक : प्रतिनिधी

नागपुरात महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाला आजपासून (दि.19 ) सुरुवात झाली आहे. यानिमित्त नाशिक जिल्ह्यातील देवळालीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आमदार सरोज अहिरे या आपल्या दोन महिन्याच्या बाळाला घेऊन थेट नागपूर विधान भवनात अधिवेशनात सहभागी होण्यासाठी दाखल झाल्या आहेत. मूळच्या नाशिकच्या असलेल्या सरोज अहिरे यांनी शिर्डीवरुन समृद्धी महामार्गावरुन प्रवास करत थेट नागपूर गाठलं. त्याच्या या कृतीच अनेक जण कौतुक करत आहेत.
दरम्यान यावेळी त्यांचा प्रवासाचा अनुभव आणि दोन महिन्याच्या बाळाला घेऊन विधानभवनात आल्यानंतर त्यांनी त्यांच्या भावना माध्यामांशी बोलताना सांगितल्यात. त्या म्हणाल्या,’आम्ही नाशिक व्हाया शिर्डी समृद्धी महामार्गाने आलो. प्रवासात बऱ्याचशा अडचणी आल्या. पण आता त्याच अडचणी सारखं-सारखं सांगणं बरोबर नाही. मी इथपर्यंत आलेले आहे. काल पूर्ण वेळ आम्ही आराम केला. आणि आता सभागृहाचं कामकाज करण्यासाठी मी इथे आलेली आहे.’ मी सभागृहात बसलेली असली तरी माझं लक्ष विचलित होणार नाही. पण कुठे तरी आई म्हणून मनाच्या कोपऱ्यात बाळ रडतंय का?, किंवा त्याला आपली गरज आहे का.. हा प्रश्न नेहमीच प्रत्येक आईच्या डोक्यात असतो. तसाच माझ्याही राहील तिथे.’ मोबाइलद्वारे असेल किंवा अधिकाऱ्यांना फोन करुन असेल किंवा इतर माध्यमातून माझं ऑफिस ठामपणे काम करतंय. अनेक भूमिपुजनं मी नसतानाही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या, गावकऱ्यांच्या, ज्येष्ठ लोकांच्या हस्ते पार पडलेली आहे. त्यामुळे माझं काम सुरु आहे. यामुळे नागरिकांनी मला समजून घेतलं आहे. अजून तीन महिन्यांचा प्रश्न आहे.’ मला जिथे शक्य होईल तिथे मी बाळाला घेऊन काम करेन. जिथे मला शक्य होणार नाही.. तिथे माझी जनता तेवढी समजदार आहे. त्यांच्या पाठिंब्यानेच मी इथपर्यंत येऊ शकलेली आहे.’ असं म्हणत सरोज अहिरे यांनी आपल्या आईपणाच्या जबाबदारीसोबतच मतदारसंघातील नागरिकांसाठीही ठामपणे काम करणार असल्याचं म्हटलं आहे. मतदारसंघाचे प्रश्न महत्त्वाचे असून ते विधानसभेत येऊन उचलणे आवश्यक आहे… तसेच अडीच महिन्याच्या बाळाची आई म्हणून त्याच्याबद्दल ही कर्तव्य बजावणं महत्त्वाचं आहे.. म्हणून दोन्ही कर्तव्य एकाच वेळी बजावत असल्याचे मत सरोज अहिरे यांनी व्यक्त केलं आहे.. प्रशंसक प्रवीण वाघ असे बाळाचे नाव आहे. ३० सप्टेंबरला त्याचा जन्म झाला. त्यानंतर प्रथमच अधिवेशन असल्याने त्या बाळ व पती प्रवीण वाघ आणि अन्य कुटुंबीयांसह विधानभवनात पोहोचल्या. दरम्यान आ. अहिरे या अडीच महिन्याच्या बाळाला विधानभवनात पोहचल्यानंतर त्यांचे फोटो व्हिडिओ त्यांच्या समर्थकानाकडून व्हायरल केले जात आहे.

Bhagwat Udavant

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

7 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

7 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

7 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

8 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

8 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

8 hours ago