नाशिक शहर

आदित्य ठाकरे यांचे मुख्यमंत्री शिंदे यांना आव्हान

ठाण्यात माझ्याविरुद्ध निवडणूक लढवून दाखवा

नाशिक : प्रतिनिधी

सरकार पाडून घटनाबाह्य असलेले सरकार महाराष्ट्राला मान्य नाही. यांच्यात हिम्मत असेल तर महापालिकेच्या निवडणुका लावून दाखवा. मुख्यमंत्री शिंदेनी राजीनामा देऊन वरळीतून उभे राहण्याचे आव्हान केले होते. जाऊ द्या ठाण्यातून राजीनामा द्या मी तिथून निवडणूक लढवितो. होऊ न जाऊ द्या कारण ठाणे देखील शिवसेनेचा बालेकिल्ला आहें. मात्र यांना निवडणूक होऊ द्यायची नाही. कारण प्रशासक राजवटीच्या नावाखाली मुंबई महापालिकेत घोटाळा सुरु असल्याचा घणाघात युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला.
नाशिकरोड येथील आनंद ऋषीं शाळेजवळील जाधव मळा येथे आदित्य ठाकरे यांची सोमवारी (दि.6) जाहीर सभा झाली. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आंबदास दानवे, माजी मंत्री बबन घोलप, उपनेते सुनील बागुल, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, सह संपर्क प्रमुख दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गीते, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, विलास शिंदे, योगेश गाडेकर, माजी उप महापौर प्रथमेश गीते, नितीन चिडे, सागर कोकणे, प्रशांत जाधव, केशव पोरजे, सागर भोजने, प्रशांत दिवे, अस्लम मणियार आदी सहमोठया संख्येने पदाधिकरी उपस्थित होते.
आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यात हे गद्दार कुठेही गेले तरी पन्नास खोके एकदम ओके अशा घोषणा देऊन हिनवले जाते. सध्या राज्यात हा गट, ती सेना अशा चर्चा होताना दिसते,  मात्र गट वैगरे काही नसून फक्त एकच सेना आहें आणि ती माझ्यासमोर आहें. या राज्यकर्त्यांनी स्वतःला  विकले आहें. म्हणून सुरतला पळाले, यांना सभेसाठी लोक मिळत नाही खोक्यातून पैसे वाटावे लागत असल्याची टीका त्यांनी केली. यांनी स्वतःच्या स्वार्थाकारिता राज्यातील उद्योग गुजरातला जाऊ दिले. या उद्योगातून तीन लाख रोजगार मिळणार होता. यांनी त्यांच्या गलिच्छ राजकारणसाठी सामान्य माणसाचे अतोनात नुकसान केले. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आंबदास दानवे म्हणाले, भाजपा आणि गद्दार शिंदे गट यांच्या मनात कोणी धडकी भरविली असेल तर ती  32 वर्षाच्या आदित्य ठाकरे या युवकांने. राज्यात भविष्यात होणार्‍या निवडणुका आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात परिवर्तन होणार आहें. शेतकरी महिला, बेरोजगार, युवकां यांच्यासाठीचे व्हिजन आदित्य ठाकरे यांच्याकडेच आहें.आगामी काळातील लढाई अवघड असून गनिमी काव्याने करायची असल्याचे दानवे यांनी म्हटले.

घटनाबाह्य मुख्यमंत्र्याची एकच कॅसेट

राज्याचे मुख्यमंत्री आहे ते घटनाबाह्य आहे. मात्र त्यांनी राज्याच्या प्रश्नाकडे आणि विकासाकडे यांचे लक्ष नाही कारण त्यांना त्याच्याशी काही देणे घेणे नाही. तें कधी क्रिकेटवरून बोलताना म्हणतात की आम्ही सहा महिन्यापूर्वी वनडे सामना जिंकला. दहीहंडीच्या कार्यकमाला गेल्यावर सांगतात आम्ही नऊ  थर लावून दहीहंडी फोडली. राज्याकडे लक्ष द्या आता किती दिवस तीच ती कॅसेट लावणार, असा हल्लाबोल मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर ठाकरे यांनी केला.
….

ब्लू प्रिंट अन दत्तक नाशिकचे काय झाले?

यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी नाशिकच्या विकासावावर बोलताना म्हटले की,  दहा वर्षांत
नाशिकला काय मिळाले, शहराची मोठी पीछेहाट झाली आहें. पर्यटन मंत्री असताना विविध मार्गाने निधी देण्यासाठी प्रयत्न केले. आधी कोणतीतरी ब्लु प्रिंट होती. नंतर नाशिक दत्तक घेणार असल्याचे म्ह्टले. त्यातच आताचे  उपमुख्यमंत्री यांनी तर नाशिकसाठी मेट्रोची घोषणा केली होती. शहरात साधा मेट्रोसाठी एकतरी पोल लावला का? अशी जळजळीत  टीकाही ठाकरे यांनी केली. शहराचा विकास करायचा असेल तर महापालिकवर भगवा फडकवाच लागेल.

प्रभागातील चार गद्दारांना पाडणारच
महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी जेथे आदित्य ठाकरे यांची सभा झाली. त्याच प्रभागातील सेनेचे चार माजी नगरसेवक यांनी शिंदे गटात प्रवेश केला, दरम्यान यावेळी या चार ही गद्दारांना पुन्हा निवडून येऊ देणार नसल्याचे बडगुजर यांनी म्हटले. सागर कोकणे, प्रशांत जाधव, व भैया मणियार यांच्यावर पालकमंत्र्यांच्या दबावाखाली पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचा आरोप केला. गोळीबार प्रकरणी शिंदे गटातील सहा आरोपी असताना एकालाच अटक केली, कारण यामध्ये पालकमंत्र्याचा हस्तक्षेप झाल्याचा आरोप बडगुजर यांनी केला.

Ashvini Pande

Recent Posts

घिबली अ‍ॅपची कमाल; मशालच्या जागी कमळ!

घिबली अ‍ॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…

20 hours ago

नियोजित वधुचे अफेअर उघड, विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन

नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…

1 day ago

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…

2 days ago

नाशिकरोडला डॉ. आंबेडकर यांची जयंती उत्साहात

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…

3 days ago

सिन्नर तालुक्यात अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम

शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर  प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…

3 days ago

शहरात पाण्याच्या टँकरची संख्या वाढली

80 फेर्‍या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…

3 days ago