शिवसैनिकांमध्ये जल्लोषाचे वातावरण: विजय करंजकर
नाशिक : प्रतिनिधी
शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा नेते माजी मंत्रीआदित्य ठाकरे सोमवारी ( दि.6) रोजी नाशिक दौऱ्यावर येत असल्याने कार्यकर्त्यांत जल्लोषाचे वातावरण आहे. त्याच दिवशी सांयकाळी सहा वाजता नाशिकरोड येथे त्यांची आनंदऋषीजी शाळेमागील सुवर्णा सोसायटीच्या पटांगणात जंगी जाहीर सभा होणार असल्याने ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे,अशी माहिती जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी दिली.
सभेच्या नियोजनाबाबत शालिमार येथील शिवसेना कार्यालयात आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना करंजकर बोलत होते.शिवसेना उपनेते सुनिल बागुल, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर,माजीआमदार वसंत गिते, योगेश घोलप, मनपा माजी गटनेते विलास शिंदे,उप जिल्हाप्रमुख जगनराव आगळे,युवासेना जिल्हाधिकारी दीपक दातीर,माजी महानगरप्रमुख सचिन मराठे,महेश बडवे आदी व्यासपीठावर होते.
आदित्य ठाकरे यांची युवकांमध्ये चांगली प्रतिमा आहे. त्यामुळे ते या घटकांविषयी काय बोलतात याची उत्सुकता आहे.
असे सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड आपल्या भाषणात म्हणाले. गद्दारांनी दगा दिल्यानंतरही न डगमगता आदित्य ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे आणि उध्दव ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे चालू ठेवल्याने त्यांचे करावे तितके कौतुक थोडे आहे. असे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर म्हणाले. आगामी महापालिका निवडणुकांत ठाकरे गट निर्विवाद विजय मिळवेल आणि पक्षाची एकहाती सत्ता येईल यात शंका नाही.त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांनी आदेशाची वाट न बघता सर्व शक्तीनिशी कामाला लागून उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचे हात बळकट करावे तसेच बालेकिल्ल्यात होणाऱ्या सभेला जास्तीत जास्त शिवसैनिकांनी उपस्थित राहावे. असे आवाहन माजी आमदार वसंत गिते व माजी म.न.पा.गट नेते विलास शिंदे यांनी केले.
बैठकीस भा.वि.से.जिल्हा संघटक वैभव ठाकरे, विधानसभा प्रमुख बाळासाहेब कोकणे,सुभाष गायधनी,तालुकाप्रमुख प्रकाश म्हस्के,भगवान आडोळे,संपत चव्हाण,माजी महापौर नयना घोलप,माजी उप महापौर प्रथमेश गिते,माजी नगरसेवक संतोष गायकवाड,केशव पोरजे,भैय्या मणियार,सुनिता कोठुळे आदींसह नाशिक लोकसभा मतदार संघातील शिवसेना पदाधिकारी,लोकप्रतीनीधि मोठ्या संख्येने उपस्थित होते.