नांदगाव पंचायत समितीला भ्रष्टाचाराची कीड
प्रशासन अधिकारी प्रमोद नवले आठ हजारांची लाच स्विकारताना रंगेहाथ जाळ्यात
मनमाड : आमिन शेख
नांदगाव तालुक्यातील सर्वच प्रशासकीय कार्यलयाला भ्रष्टाचाराची कीड लागली असुन यात पंचायत समिती देखील मागे नाही पंचायत समितीचे प्रमोद रंगनाथ नवले वय 46 वर्षे, सहायक प्रशासन अधिकारी रा .महाजन वाडा ,मुक्ताई नगर मालेगाव रोड नांदगाव यांना ८ हजारांची लाच स्विकारताना अटक करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की यातील तक्रारदार यांचे कार्यालयाचे दप्तर तपासणीसाठी नवले येणार होते ,तरी कार्यालयात तक्रारदार यांची टेबलाची तपासणी व्यवस्थित करून देतो ,म्हणून व चांगले तपासणी करण्याचा अहवाल देतो म्हणून यातील नवले यांनी तीन हजार रुपये द्या अशी तीन हजार रुपयाची लाचेची मागणी केली . तसेच यातील तक्रारदार यांच्या कार्यालयातील निलंबित झालेला कर्मचारी जमदाडे याची नाशिक येथील कार्यालयात चौकशी सुरू असून त्याला भेटून मला त्याच्याकडून सुद्धा पैसे आणून द्या ,मी नाशिक येथील कार्यालयातून त्याची चौकशी क्लिअर करून आणतो असे सांगून एकूण आठ हजार लाच स्वीकारून यातील नवले हा तक्रादार यांची दप्तर तपासणी चे 3000/- रुपये व जमदाडे यांची चौकशी क्लिअर करण्याचे 5000/- हजार रुपये असे मिळून एकूण 8000/- रुपये घेताना रंगेहात मिळून आला.म्हणून त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम. 7, व 7 अ अन्वये गुन्हा आहे. नमूद गुन्हा नांदगाव पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला आहे .या कामात शर्मिष्ठा घारगे पोलीस अधीक्षक नाशिक जिल्हा लाचलुचपत विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी म्हणून एकनाथ गं.पाटील पोलीस उपअधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, तर सापळा पथक म्हणून पोहवा.सुनील पवार ,पोहवा संदीप वणवे पोहवा . योगेश साळवे सर्व नेमणूक ला.प्र.वि. नाशिक युनिट .यांनी काम बघितले.
कसबे सुकेणे येथील तिडके वस्तीवर जेरबंद झाला बिबट्या कसबेसुकेणे: येथील दशरथ पोपट तिडके यांच्या शेत…
सातपूर: प्रतिनिधी सातपूर एमआयडीसीतील ज्योतीस्ट्रक्चर कंपनीला आज दुपारच्या सुमारास आग लागली . या आगीचे कारण…
लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद लासलगाव:-समीर पठाण केंद्र सरकारने कांद्यावरील…
मनमाड : प्रतिनिधी मराठीत एक म्हण आहे साधु संत येता दारी तोच दसरा दिवाळी ती…
ऑनर किलींग रोखण्यासाठी आता हेल्पलाईन तर गेस्ट हाऊस होणार सेफ होम ! निर्णयाचे अंनिस कडून…
पारा ५.७ अंशावर स्थिर ,द्राक्षबागायतदार अस्थिर! निफाड : प्रतिनिधी शहरासह तालुक्यात थंडीने मुक्काम. वाढविला आहे…