416 मतदान केंद्रांवर 3,72,543 मतदार हक्क बजावणार
नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यातील 11 नगरपालिका, नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणुकीत तीन लाख 72 हजार 543 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
जिल्ह्यातील इगतपुरी, नांदगाव, भगूर, ओझर, त्र्यंबकेश्वर, पिंपळगाव (बसवंत), मनमाड, येवला, सिन्नर, सटाणा आणि चांदवड या 11 नगरपरिषद, नगरपालिकांच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.2) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरुवात होईल. संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदारांना आपला हक्क बजावता येणार आहे. 416 मतदान केंद्रांवर एकूण तीन लाख 72 हजार 543 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यात सर्वाधिक मतदार मनमाड नगरपरिषदेत आहे. कोठीही अनुचित प्रकार घडू नये आणि मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. यासाठी दोन हजार 500 निवडणूक कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येकी एका मतदान केंद्रावर पाच अधिकारी राहणार आहेत. हे अधिकारी संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवतील.
या निवडणुकीत संवेदनशील मतदान केंद्र एकही नसले तरी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी शहर पोलीस आणि ग्रामीण पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच ईव्हीएम मशिन आणि कर्मचार्यांची ने-आण करण्यासाठी 150 वाहने सज्ज ठेवण्यात आली आहेत.
असा आहे पोलीस बंदोबस्त
ग्रामीण पोलीस- अप्पर अधीक्षक दोन, उपअधीक्षक- सहा, पोलीस निरीक्षक 20, सहायक/उपनिरीक्षक 50, अंमलदार 500, शीघ्र कृतीदल दोन तुकड्या, राखीव पोलीस दल दोन तुकड्या
शहर पोलीस- पोलीस उपायुक्त दोन, सहायक आयुक्त तीन, पोलीस निरीक्षक 10, सहायक/ उपनिरीक्षक 25, अंमलदार 250, शीघ्र कृतीदल एक तुकडी, राखीव पोलीस दल एक तुकडी.
एकूण मतदान केंद्रे
416
निवडणूक कर्मचारी
2,500
मतदान यंत्रे
1,893
वाहनव्यवस्था
150
एकूण मतदार
3,72,543
सर्वधिक मतदान
66,594 (मनमाड)
सर्वांत कमी मतदान
12,255 (भगूर)
तृतीयपंथी मतदार
18
पुरुष मतदार
1,87,906
महिला मतदार
1,84,619
मतदानाचा टक्का वाढण्यासाठी जनजागृती
निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढण्यासाठी प्रशासनाच्या वतीने जनजागृती मोहीम राबवण्यात आली. त्यातून मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासोबतच मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.
ओळख पटवण्यासाठी ही कागदपत्रे ग्राह्य
निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावर मतदारांची ओळख पटवण्यासाठी जे मतदार मतदान ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी भारतीय पासपोर्ट, आधारकार्ड, पॅनकार्ड, स्थानिक स्वराज्य संस्था ओळखपत्र, राष्ट्रीयीकृत बँक व पोस्टामधील खातेदाराचा फोटो असणारे पासबुक, अपंगत्व दाखला, रोजगार हमी योजनेचे जॉब कार्ड, लोकसभा, विधानसभा, विधानपरिषद सचिवालयाने सदस्यांना दिलेले ओळखपत्रे ही कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाणार आहेत.
इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांवर बंदी
मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात मोबाइल वापरास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. तसेच कॅमेरा, पॉवरबँक, टॅब्लेट, लॅपटॉप, स्मार्टवॉच, ब्लूट्रुथ यांसारख्या इलेक्ट्रॉनिक्स साधनांची मतदान केंद्र परिसरात ने-आण करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…
लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…
हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…
मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…
देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…
शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…