नाशिक : प्रतिनिधी
महापालिकेने शहरातील वाहतूक बेटांमध्ये बसविलेले लोखंडी फलक अपघाताला आमंत्रण देणारे ठरू शकतात. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात न घेताच हे फलक उभारण्यात येत आहेत.
महापालिकेने उत्पन्नवाढीसाठी शहरातील वाहतूक बेटांमध्ये लोखंडी फलक उभारले आहेत. त्यासाठी काही ठिकाणच्या वाहतूक बेटांमध्ये असणारी शोभिवंत फुलझाडेही तोडून टाकली. आयटीआय सिग्नलजवळ असलेल्या वाहतूक बेटामध्ये बसविलेला फलक अगदी रस्त्याला खेटूनच आहे. अवजड वाहनाचा या फलकाला धक्का लागून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा फलक अतिशय चुकीच्या दिशेला बसविण्यात आला असून, फलकाचा काही भाग थेट रस्त्यावरच आला आहे. या मार्गे अनेक अवजड वाहनेही जात असतात. कंटेनरचा धक्का लागला तरी हा फलक पडू शकतो. असे असतानाही संभाव्य धोक्याकडे दुर्लक्ष करून ठेकेदाराने हा फलक बसविला आहे. याबाबत मनपा आयुक्तांनी पाहणी करून संबंधित फलकाबाबत योग्य तो निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे मत अनेक वाहनधारकांनी व्यक्त केले आहे
नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…
भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…
छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…
12 राशींचे राशीभविष्य मेष रास मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…
रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…
नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…