हिरेंना न्यायालयात हजर करतांना समर्थकांची घोषणाबाजी

हिरेंना न्यायालयात हजर करतांना समर्थकांची घोषणाबाजी

मालेगाव: प्रतिनिधी

शिवसेना उबाठा गटाचे उपनेते डॉ. अद्वय हिरे यांना आज(ता.१६) सकाळी दहा वाजेच्या सुमारास मालेगाव न्यायालयात हजर करण्यात आले आहे. यावेळी न्यायालयाच्या हिरे समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे, हिरेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी न्यायालयात इतरांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जाच्या थकबाकीमुळे शिवसेना उपनेते डॉ. हिरे यांच्या विरोधात दाखल गुन्ह्यात पोलिसांनी त्यांना अटक केली. रेणुका सहकारी सूतगिरणीसाठी घेतलेले ७ कोटींचे कर्ज थकविल्याचा आरोप आहे. याप्रकरणी जिल्हा बँकेने मालेगाव रमजानपुरा पोलिसांत गुन्हा दाखल केला होता.दरम्यान डॉ. हिरे यांना आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी भोपाळ येथून अटक केली. रात्री उशिरा त्यांना मालेगाव येथे आणण्यात आले. पोलिस ठाण्याच्या तसेच न्यायालयाच्या आवारात रात्रीदेखील समर्थकांची मोठी गर्दी झाली होती.

ऐन दिवाळीत हिरेंना अटक झाल्यानंतर हिरे समर्थक आक्रमक झाले आहेत. काल रात्री (ता.१५) ला रात्री उशिरा न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर देखील गर्दी झाली होती.परंतू रात्री न्यायालयात हजर न करता आज सकाळी न्यायालयात हजर करताच हिरे समर्थकांनी घोषणाबाजी केली, दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मालेगाव पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *