मालेगाव: प्रतिनिधी
शिवसेना उबाठा पक्षाचे उपनेते डॉ. अद्वय हिरे यांना आज मालेगाव न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. काल (ता.१५) ला डॉ. अद्वय हिरे यांना पोलिसांनी भोपाळ येथून ताब्यात घेतले. न्यायालयात हजर केले असता २० नोव्हेंबर पर्यंत पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे.
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जाच्या थकबाकीमुळे शिवसेना उपनेते डॉ. हिरे यांच्या विरोधात दाखल गुन्ह्यात पोलिसांनी त्यांना अटक केली. रेणुका सहकारी सूतगिरणीसाठी घेतलेले ७ कोटींचे कर्ज थकविल्याचा आरोप आहे. याप्रकरणी जिल्हा बँकेने मालेगाव रमजानपुरा पोलिसांत गुन्हा दाखल केला होता.दरम्यान डॉ. हिरे यांना आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी भोपाळ येथून अटक केली. रात्री उशिरा त्यांना मालेगाव येथे आणण्यात आले.
पोलिस ठाण्याच्या व न्यायालयाच्या आवारात रात्रीदेखील समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. हिरेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी न्यायालयात इतरांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ऐन दिवाळीत हिरेंना अटक झाल्यानंतर हिरे समर्थक आक्रमक झाले आहेत. काल रात्री (ता.१५) ला रात्री उशिरा न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर देखील गर्दी झाली होती.परंतू रात्री न्यायालयात हजर न करता आज सकाळी न्यायालयात हजर करताच हिरे समर्थकांनी घोषणाबाजी केली, दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मालेगाव पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान पाच दिवसांची कोठडी हिरेंना सुनावण्यात आली आहे.
चांदवड, सुरगाणा, मालेगाव तालुक्यात प्रत्येकी एका गटाने वाढ, संख्या 74 वर नाशिक : प्रतिनिधी जिल्हा…
कुपोषित बालकांच्या आरोग्य संवर्धनासाठी जिल्हा परिषदेचा उपक्रम नाशिक : प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या पोषणदूत उपक्रमांतर्गत अंतर्गत…
उर्वरित सव्वाशे कोटींच्या कामांना मात्र हिरवा कंदील नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने…
रात्रीच्या वेळी घरांच्या कड्या वाजवून दहशत माडसांगवी : वार्ताहर लाखलगावसह परिसरात चोरांच्या दहशतीमुळे लाखलगावचे ग्रामस्थ…
लग्न न करता एकत्र राहण्याचे (लिव्ह इन रिलेशनशिप) फॅड अलीकडे खूप वाढले आहे. विशेषतः शहरात…
नाशिक ः काल शेवटच्या श्रावणी सोमवारी रिमझिम पावसातदेखील जवळपास लाखभर शिवभक्तांनी श्री कपालेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी…