अद्वय हिरे यांचा जामीन फेटाळला
नाशिक प्रतिनिधी जिल्हा बँक फसवणूक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना न्यायालयाने कोणताच दिलासा नाही. सोमवारी दोन्ही बाजुंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आला. त्यावर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता, आज याबाबत निकाल देताना न्यायालयाने हिरे यांचा जामीन फेटाळून लावला. रेणुका सूत गिरणी कर्ज फसवणूक प्रकरणात हिरे यांना अटक केल्यानंतर त्यांना अगोदर पोलीस आणि नंतर न्यायालयीन कोठडी सुनावली होती. न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे जामीन मिळेल, अशी आशा व्यक्त होत होती. परंतु न्यायालयाने आज त्यांचा जामीन फेटाळून लावला.