डॉ.अद्वय हिरे यांना पुन्हा तीन दिवस पोलिस कोठडी
नाशिक जिल्हा बँक कर्ज फसवणूक प्रकरण
मालेगाव: प्रतिनिधी
शिवसेना उबाठा पक्षाचे उपनेते डॉ. अद्वय हिरे यांना दुसऱ्यांदा मालेगाव न्यायालयात हजर आले. यावेळी तीन दिवसांनी(ता.२३) पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आज (ता. २०) रोजी पाच दिवसांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयात पोलिसांनी हजर केले, यावेळी मोठया संख्येने कार्यकर्ते न्यायालयाच्या बाहेर उपस्थित झाले आहेत, (ता.१५) ला डॉ. अद्वय हिरे यांना पोलिसांनी भोपाळ येथून ताब्यात घेतले होते. त्यावेळी त्यांना न्यायालयात हजर केले असता २० नोव्हेंबर पर्यंत पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान आज डॉ. हिरेंना जामीन मिळते का नाही याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते, परंतु हिरेंना पुन्हा तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जाच्या थकबाकीमुळे शिवसेना उपनेते डॉ. हिरे यांच्या विरोधात दाखल गुन्ह्यात पोलिसांनी त्यांना अटक केली होती. रेणुका सहकारी सूतगिरणीसाठी घेतलेले ७ कोटींचे कर्ज थकविल्याचा आरोप आहे. याप्रकरणी जिल्हा बँकेने मालेगाव रमजानपुरा पोलिसांत गुन्हा दाखल केला होता.
गेल्या वेळी पोलिस ठाण्याच्या व न्यायालयाच्या आवारात रात्रीदेखील समर्थकांची मोठी गर्दी केली होती. आज पुन्हा पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.ऐन दिवाळीत हिरेंना अटक झाल्यानंतर हिरे समर्थक आक्रमक झाले होते. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मालेगाव पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. हिरेंना पुन्हा तीन दिवसांची कोठडी मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे
घरात घुसला, अंगावर पेट्रोल टाकून पेटवले अन नंतर केले असे काही... नाशिक: …
काँग्रेस मेळावा नाशिक : प्रतिनिधी वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा…
कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अभोणा उपबाजारात शेतकर्यांंनी गुरूवारी सुमारे 700 ट्रँक्टर मधून 15 हजार…
नाशिक : प्रतिनिधी गेल्या तीन चार महिन्यांपासून हा तिकडे चालला तो तिकडे चालला अशा अफवा…
नाशिक : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पाठोपाठ मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर केला होता.आगामी स्तानिक स्वराज संस्थेच्या…
नाशिक : प्रतिनिधी वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न असला…