नाशिक जिल्हा वाहतूक सेनेच्या वतीने मातोश्रीवर प्रतिज्ञापत्र सुपूर्द

इंदिरानगर वार्ताहर |

नाशिक जिल्हा वाहतूक सेनेच्या वतीने नाशिक शहरातून अकरा हजार शिवसेना सदस्य अर्ज व एक हजार प्रतिज्ञापत्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कडे सुपूर्द केले.दसरा मेळाव्याचे चित्र आजच डोळ्यासमोर दिसत असल्याच्या भावना उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केल्या.शिवसेना कामगार सेनेचे अध्यक्ष व नव्याने नियुक्त झालेले शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी यावेळी बोलताना शिवसेनेची ही वाहतूक सेना ही शिवसेनेच्या विचारांची वाहतूक सेना व्हावी अशी भावना यावेळी बोलताना व्यक्त केली .यावेळी वाहतूक सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना उद्देशून बोलताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले ,आजच मला दसऱ्याचे चित्र समोर दिसते आहे .बऱ्याच दिवसांनी आज माझी तुमच्याबरोबर भेट होत आहे .मला तुमच्याकडून एवढे शपथपत्र पाहिजेत की शपथपत्र वाहण्यासाठी मला वाहतूक सेनेची गरज लागली पाहिजे. आपल्याकडे कुठलेही माणसं भाडोत्री नाहीत .आपण तन-मन-धनाने या ठिकाणी आलात, मला आनंद वाटला. वाहतूक सेनेचे काम करताना तुम्हाला खड्ड्यांची सवय आहे. पण आज जे काही खड्डे पडलेले आहेत त्यांचं पुढे काय करायचं ते मी बघतो. तुम्ही मला फक्त शपथपत्र द्या बाकी खड्ड्यांचं काय करायचं ते माझ्यावर सोडा.
भेटी प्रसंगी शिवसेनेचे उपनेते बबनघोलप, उपनेते अल्ताफ शेख, संपर्कप्रमुख देवानंद बिरारी, उत्तर महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष अजीम सय्यद व वाहतूक सेनेचे सर्व पदाधिकारी, वाहतूक सेनेचे जवळपास पाचशे सदस्य यावेळी मातोश्री ठिकाणी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *