सुभाष भामरे यांच्यानंतर हेमंत गोडसेही भुजबळ यांच्या भेटीला

सुभाष भामरे यांच्यानंतर हेमंत गोडसेही भुजबळ यांच्या भेटीला
नाशिक: प्रतिनिधी
दिल्लीच्या वरिष्ठ नेत्यांनी सूचना करूनही उमेदवारी जाहीर न झाल्याने उमेदवारी च्या स्पर्धेतून माघार घ्यावी लागलेल्या छगन भुजबळ यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली. त्यातच हेमंत गोडसे यांच्या प्रचार पत्रकावर भुजबळ यांचा फोटो न छापल्याने भुजबळ समर्थक कमालीचे संतापले, या संदर्भातील मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होताच आज हेमंत गोडसे भुजबळ फार्मवर भुजबळ यांच्या भेटीला आले होते, असाच प्रकार धुळे जिल्ह्यात देखील घडला. महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे यांच्याही पत्रकावर भुजबळ यांचा फोटो नसल्याने भामरे देखील काल तातडीने भुजबळ यांच्या भेटीला आले होते, अनावधानाने फोटो टाकायचा राहून गेल्याचा दावा केला जात असला तरी भुजबळ समर्थक मात्र यामुळे दुखावले गेले आहेत. अगोदरच भुजबळ यांच्या उमेदवारी साठी समर्थक आग्रही होते. मात्र आता फोटोही नसल्याने सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात पोस्ट व्हायरल होत आहेत. भुजबळ हे हेमंत गोडसे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या रॅलीत सहभागी झाले होते. मात्र त्यानंतर प्रचारात सहभागी झाले नाहीत, सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे हे बारामतीत प्रचाराला गेलेलं होते, त्यामुळे आता ते प्रचारात सहभागी होतात की नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही,उमेदवारी मिळाल्यानंतर गोडसे यांचा प्रचार सुरु असला तरी प्रमुख नेतेमंडळी अजून प्रचारात दिसून येत नसल्याने आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकमध्ये येऊन महायुती च्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा एकत्रित मेळावा घेणार आहेत. आता या मेळावयनंतर महायुतीची मंडळी प्रचारात सहभागी होतात की नाही हे स्पष्ट होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *