वर्षभरात 10 कोटींची घट; दोन कोटीहून अधिक उत्पन्न
चार वर्षात सरासरी अडीच कोटी उत्पन्न
एसटी महामंडळाला बूस्ट
सिडकोत गुंडाचे टोळीयुद्ध भडकले; गोळीबार करत दहशत
नाशिक ः देवयानी सोनार
एसटी महामंडळाच्या महाकार्गोच्या मालवाहतुकीतून एप्र्रिल 2023 ते मार्च 2024 या वर्षभरात 2 कोटी 19 लाख 45 हजार 773 इतके उत्पन्न मिळाले.कोरोना काळात सुरू झालेल्या एसटीच्या मालवाहतूक सेवेला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. गत जून 2020 ते जानेवारी 2022 या वीस महिन्यात पाच कोटीहून अधिक उत्पन्न एस टी महामंडळाला मिळाले होते.
नाशकात चाललंय तरी काय? सिडकोत टोळीयुध्दातून गोळीबार
दरवर्षी अडीच कोटींचे उत्पन्न एसटी महामंडळाला होत असल्याचे चित्र आहे. कोरोनापासून महाकार्गो या एसटीच्या मालवाहतुकीला सुरूवात करण्यात आली. जिल्ह्यातच माल वाहतुकीसाठी कार्गोसेवेला मागणी जास्त आहे.सटाणा नाशिक,सिन्नर मालेगाव,कळवण आदी मार्गावर मालवाहतूक जास्त प्रमाणात होते.
नाशिक पुन्हा हादरले, पंचवटीत गुन्हेगाराचा खून
उत्पन्नात यामुळे घट
कोरोना काळात विश्वासार्ह व परवडणारी सेवा म्हणून एसटी महामंडळाच्या या सेवेला व्यापारीवर्गाची पसंती मिळाली होती.परंतु जनजीवन पूर्वपदावर येत असतांना संपाचाही ङ्गटका एसटीला बसला होता.त्यानंतर बसेस नादुरूस्त, ट्रक भंगारात टाकण्यात आल्या.परिणामी ट्रकची संख्या घटल्याचा परिणामही वाहतुकीवर झाला आहे. त्याशिवाय व्यावसायिकांना पर्यायी सेवा मिळत असल्यानेही उत्पन्न घटल्याचा अदंाज व्यक्त केला जात आहे.
वर्षभरात दोन हजाराहून अधिक फेर्या
महाकार्गो या मालवाहतूक सेवेच्या वर्षभरात दोन हजार 911 ङ्गेर्या झाल्या असून तीन लाख 36 हजार 163 किमीचा प्रवास झाला आहे. 66 रू. प्रतिकिलोमीटर उत्पन्न मिळाले आहे.
लॉकडाऊमध्ये एसटी बसेसची प्रवाशी वाहतूक बंद करण्यात आली होती.त्यानंतर एसटीचा संप अशा कारणांमुळे एसटीच्या उत्पन्नात घट झाली होती.आधीच तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाच्या उत्पन्न वाढीसाठी मालवाहतूकीचा निर्णय घेण्यात आला होता.त्यामुळे उत्पादन राज्यभरात पोहचविण्यासाठी सुरक्षित सेवा मिळत असल्याने उद्योग व्यावसायीक.शेतकरी आदींनी एसटीच्या मालवाहतूक सेवेसाठी चांगला प्रतिसाद दिला होता. एसटीकडे वाहतुकीचा अनुभव,तात्काळ सेवा,सुरक्षित वेळैवर वितरण तसेच राज्यभरात मालवाहतूक सेवा उपलब्ध करण्यात आल्याने महाकार्गोच्या सेवेस पसंती मिळाली होती. महाकार्गा मालवाहतूकीद्वारे एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे विभाग नियंत्रक अरूण सिया यांनी सांगितले.
गंगापूररोडवर बांधकाम साईटवर दुर्घटना; भिंत कोसळून दोन कामगार ठार, दोन जखमी
कोरोना काळातील महाकार्गोद्वारे मिळालेले उत्पन्न सध्या घटले आहे.काही मालवाहतूक बसेस स्क्रॅपमध्ये गेल्या आहेत. ट्रक संख्या कमी केली आहे. त्यामुळे शक्य तेवढ्या महाकार्गोद्वारे सेवा देत उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत.
अरूण सिया
विभाग नियंत्रक
धुळ्यातून डॉ. शोभा बच्छाव यांना काँग्रेस ची उमेदवारी जाहीर
महाकार्गोचे जून 2020 ते जानेवारी 2022 या वीस महिन्यात 5 कोटी 64लाख 24हजार 883 इतके उत्पन्न मिळाले म्हणजेच महिन्याला 28 लाख36हजार 244.15 इतके मिळाले होते.आणि एप्र्रिल 23 ते मार्च 24 या वर्षभरात 2 कोटी 19 लाख 45 हजार 773 इतके उत्पन्न मिळाले. म्हणजेच 18 लाख 28 हजार 817.42 रूपये मिळाले म्हणजेच 10 लाख 7 हजार 429 .73 इतकी घट झाली.टक्यांमध्ये जवळपास 35.52 टक्के घट दिसून येत आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार 31 जुलैपर्यंत विशेष मोहीम निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा…
जिल्ह्यातील स्थिती; भावात घसारण अन् उत्पादन खर्चवाढीचा परिणाम लासलगाव : समीर पठाण मे महिन्यात झालेल्या…
र्गा भागवत यांचा जन्म इंदूर शहरात 10 फेब्रुवारी 1910 रोजी झाला. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान…
षाढातील कोसळणार्या पाऊसधारा, कुरकुरीत कांदे भज्यांसोबत रंगणार्या गप्पा, अशी छान मैफल कांदेनवमीला रंगत जाते. खवय्यांच्या…
नाशिक : प्रतिनिधी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधारेमुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे.…
शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का; बागूल, राजवाडेंचा प्रवेश लांबणीवर नाशिक :…