नाशिक

उद्योगमंत्र्यांच्या पत्रानंतर आजचा उद्योग बंदचा निर्णय मागे

 

नाशिक : प्रतिनिधी
‘निमा’चे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या कार्यालयावर झालेला हल्ला हा उद्योग जगतावरील हल्ला असून तो  निषेधार्थ आहे. परंतु उद्योजक , कामगारांचे नुकसान होऊ नये यासाठी उद्योजकांनी बंद मागे घ्यावा असे पत्र उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पाठविले. तसेच आरोपींना कठोर कारवाई होणारच असे आश्वासन देखील सामंत यांनी देऊन, या प्रश्नबाबत ७ किंवा ८ जुन रोजी मुख्यमंत्र्यांसमवेत मुंबईत बैठक होणार आहे. त्यामुळे   शुक्रवारी (दि.२) जिल्ह्यातील सर्व उद्योग बंद ठेवण्याचा एकमुखी निर्णय मागे घेण्यात आल्याची माहिती उद्योजकांच्या सुकानु समितीचे सदस्य ज्ञानेश्वर गोपाळे यांनी दिली.
निमा येथे आयोजीत पत्रकार परिषदेत निमाचे अध्यक्ष धनंजय बेले, उपाध्यक्ष किशोर राठी वरून तलवार ,डीजे जोशी, जोशी आयमा अध्यक्ष निखिल पांचाळ , योगेश पाटील, ज्ञानेश्वर
गोपाळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
गोपाळे यांनी निर्णय जाहीर करण्यापूर्वी बेले यांनी सर्व उद्योग व कामगार संघटनांनी पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले. उद्योग मंत्र्यांचे लेखी पत्र, भाजपा प्रदेश अध्यक्ष बावनकुळे, मंत्री गिरिश महाजन, दादा भुसे यांच्यासह विविध राजकीय पक्षांनी फोनवर कंपनीवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. परंतु उद्योग हितासाठी  चांगले कार्य सुरू असताना तुम्ही एक पाऊल मागे या अशी विनंती सर्वांनी केली. आरोपीवर कठोर कारवाईचे देखील आश्वासन दीले. त्यामुळे बेले यांनी उद्योग बंदचा निर्णय मागे घ्यावा  अशी विनंती सुकानु  समितीला केली. त्यानंतर सुकानु समिती तर्फे गोपाळे यांनी निर्णय जाहीर केला. बंदला सर्वच उद्योग संघटना, सिटू सह इतर  कामगार संघटनेनेही पाठींबा दिल्याचे राजेंद्र अहिरे यांनी सांगितले.
सिन्नर इंडस्ट्रीज मन्यू फॅक्चर असोसिएशन तर्फे बनावट लेटर हेड वर उद्योग बंदला पाठिंबा नसल्याचे सर्वत्र व्हायरल झाले.ते कोणीतरी चुकीच्या लोकांनी केल्याचे अध्यक्ष किशोर राठी यांनी सांगितले. संस्थेचा प्रव क्ता लवकरच जाहीर करू असेही राठी म्हणाले. आम्ही कायम उद्योग विकासासोबत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Ashvini Pande

Recent Posts

छगन भुजबळ मंत्रिमंडळात,उद्या मुंबईत शपथविधी

छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…

7 hours ago

राशीभविष्य

12 राशींचे राशीभविष्य मेष रास  मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…

14 hours ago

झाडे उठली जीवावर!

रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…

15 hours ago

अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू

नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…

15 hours ago

‘सचेत’ अ‍ॅप देणार आपत्तीची माहिती

अ‍ॅपचा वापर करण्याचे पंतप्रधानांकडून आवाहन नाशिक : प्रतिनिधी नागरिकांना नैसर्गिक आपत्तीसह ऊन व पावसाची माहिती…

15 hours ago

वडनेरला द्राक्ष उत्पादकाची पंधरा लाखांची फसवणूक

पिंपळगावच्या व्यापार्‍याविरोधात गुन्हा दाखल चांदवड : वार्ताहर तालुक्यातील वडनेरभैरव येथील द्राक्ष उत्पादक शेतकर्‍याची तब्बल 15…

15 hours ago