देवयानी सोनार
मुलींच्या आयुष्यात वडिलांचे स्थान नेहमीच आदर, हळवे, मार्गदर्शनाचे राहिले आहे. वडील आय.सी.आर.इ. इंजिनिअरिंग महाविद्यालयात रजिस्टार म्हणून कार्यरत होते. आईचे निधन झाल्यानंतर वडिलांनी योग्य मार्गदर्शन केले. जिथे मुलींच्या शिक्षण करिअरला विरोध करून बंधने लादले जातात अशा वेळी वडिलांनी मला स्वप्न दाखविले. माझा स्वभाव ऍग्री यंग चाइड आहे हे त्यांना समजल्याने मला इंजिनिअरिंग करायचे असताना त्यांनी स्वभाव आणि करिअर वेगळे होईल याची जाणीव करून दिली. चांगले मार्गदर्शन केल्याने या क्षेत्रात आले.
शिक्षण घेत असताना परीक्षेचा कालावधी रखडला त्यावेळी नैराश्य आले होते. त्यावेळी खंबीरपणे पाठीशी उभे राहिले. आई गेल्यामुळे वडिलांना दुःख तर होतेच, परंतु आम्हाला घडविणे ही मोठी जबाबदारी होती. आईचे विधी करताना वडिलांना मुलींना चांगले शिक्षण देऊन घडविणार असे वचन दिले.
आई नसताना माझी मानसिकता बिघडली होती. बहीण लहान होती. अशा वेळी मुलींची आई नाही तर मुलींचे लग्न लावून जबाबदारीतून मुक्त होऊ असा विचार केला असता तर वेगळे आयुष्य असते. अशा वेळी घरच्या, गावातील लोकांचा विचार करता सर्वांचा विरोध पत्करून आमच्यावर वडिलांनी विश्वास दाखवला, शिक्षणासाठी पाठवले, जमेल तसा खर्च केला. त्यांच्या मार्गदर्शन आणि पाठिंब्यामुळे मी आज या पदापर्यंत पोहोचले आहे.
– पौर्णिमा चौघुले
(पोलीस उपायुक्त, नाशिक)