नाशिक

अपघातांचे प्रमाण टाळण्यास वाहतूक विषयक नियमांचे कडक पालन गरजेचे-सरंगल

आयमाच्या पुढाकाराने वाहतूक सुरक्षेबाबत चर्चासत्र
नाशिक : प्रतिनिधी राज्यात रस्ते अपघाताचे प्रमाण कमी व्हावेत म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत.तसेच त्यात कुणी मृत्युमुखी पडू नये असे वाटत असेल तर सर्वांनीच वाहतूक सुरक्षा विषयक नियमांचे कडक पालन करावे,असे प्रतिपादन अतिरिक्त पोलिस महासंचालक(रस्ते वाहतूक) कुलवंतकुमार सरंगल यांनी केले.
रस्ते अपघात टळावेत आणि त्यामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या शून्यावर यावी तसेच वाहतूक व्यवस्था सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठी अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर असोसिएशन(आयमा)च्या पुढाकाराने आयमाच्या रिक्रिएशन हॉलमध्ये जनजागृती मोहीम व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्याचे उद्घाटन करतांना सरंगल मुंबईहून ऑनलाइन बोलत होते.अध्यक्षस्थानी आयमाचे अध्यक्ष निखील पांचाळ होते.
या कार्यक्रमात नासिक फर्स्ट, ट्रॅफिक एज्युकेशन,नाशिक महानगरपालिका,नासिक पोलिस, स्वयंसेवी संस्था रिसिलियंट इंडिया यांचाही सक्रिय सहभाग आहे.व्यासपीठावर पोलिस अधीक्षक सचिन पाटील, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प अधिकारी बी.एस.साळुंखे,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वासुदेव भगत,नाशिक फर्स्टचे श्रीकांत करोडे,आयमाचे सरचिटणीस ललित बूब,बीओटी चेअरमन धनंजय बेळे,आयमाच्या रस्ते वाहतूक सुरक्षा नियोजनाचे अध्यक्ष गौरव धारकर,वरुण तलवार आणि रिसिलियंट इंडियाचे राजीव चोबे आदी होते.
रस्ते अपघात टाळण्यासाठी स्पीड कॅप्चर मशीन प्रत्येक जिल्ह्यात बसविण्यात आले आहेत.पब्लिक,प्रायव्हेट पार्टनरशिपद्वारे (पीपीपी)आणखी कॅमेरे बसवून प्रत्येक जिल्ह्यात जास्तीत जास्त कॅमेरे उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे.जेणेकरून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारा अलगदरित्या कॅमेऱ्यात टिपला जाईल आणि त्याला समज देणे आणि दंड करणे त्यामुळे सहज शक्य होणार आहे.सुरक्षित वाहन चालविण्यावर सर्वांनी भर द्यावा,असे आवाहनही सरंगल यांनी केले.
रस्ते सुरक्षा आणि सुरक्षितरीत्या वाहन कसे चालवावे याबाबत शालेय स्तरापासूनच जनजागृती मोहीम हाती घेणे गरजेचे आहे.अमेरिकेत सर्वाधिक अपघात होतात मात्र तेथे मृत्यूचे प्रमाण कमी आहेत.त्या तुलनेने भारतात अपघातांचे प्रमाण कमी असले तरी अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या अधिक आहे ही बाब चिंताजनक म्हणावी लागेल.रस्ते अपघात टाळण्यासाठी तसेच वाहतूक सुरक्षेबाबत वेगवेगळ्या पातळींवर प्रयत्न करावे लागतील.मोठ्या प्रमाणावर ट्रामा केअर युनिट सेंटर उभारावे लागतील.अपघात झाल्यानंतर जखमींवर त्वरित प्रथमोपचार कसे होतील याबाबतही यंत्रणा उभारावी लागेल,असे जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी चर्चासत्रात स्पष्ट केले.
यावेळी आयमा अध्यक्ष  निखिल पांचाळ यांनी अपघात व मृत्यूचे प्रमाण कमी करण्याविषयी आयमाची भूमिका स्पस्ट केली. रिसिलीअंट  इंडियाचे राजीव चोबे, नाशिक फर्स्ट चे श्रीकांत करोडे, उपप्रादेशिक परिवहन अधीकारी वासुदेव भगत यांनी रस्ते अपघात टाळून मृत्यूचा दार शून्यावर कसा आणता येतील याबाबत मार्गदर्शन केले. इतर राज्य व इतर देशातील नियमावलीबाबतही त्यांनी विवेचन केले.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे बी.एस.साळुंके यांनी जनजागृतीद्वारे वाहनचालकांत शिस्त निर्माण करण्याची गरज प्रतिपादन केली. अपघातांचे प्रमाण नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक असून ही बाब चिंताजनक असल्याचा सूरही चर्चासत्रात उमटला.
कार्यक्रमास उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे,राजेंद्र कोठावदे,राहुल गांगुर्डे, जितेंद्र शिर्के,संजय देशमुख,दिलीप वाघ,अविनाश मराठे, जयंत पगार,मनिष रावल,सिद्धेश रायकर, कुंदन डरंगे,धीरज वडनेरे,देवेंद्र विभुतेअशोक ब्राह्मणकर,अजय यादव, मनोज मुळे आदी उद्योजक उपस्थित होते.गौरव धारकर सूत्रसंचालन तर  ललित बूब यांनी आभार प्रदर्शन केले.

आयमातर्फे  सातपूरमध्ये कार्बननाका, गंगापूररोड पाइपलाइन रोड,निमा कार्यालयाजवळ, अंबडमध्ये एक्सलो पॉईंट,सिन्नर येथील जिंदाल फाटा, डी मार्ट मॉलजवळ,सर्व सिग्नलजवळ वाहतूक सुरक्षा जनजागृती मोहीम राबवून अपघात व मृत्यूचे प्रमाण क्मी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

 

 

 

Ashvini Pande

Recent Posts

मराठी माणूस, ठाकरे ब्रँडमुळे सरकार झुकले

खा. वाजे : शिवसेना कार्यालयात मनसे पदाधिकार्‍यांची उपस्थिती नाशिक : प्रतिनिधी सरकारला हिंदीसक्तीचा निर्णय मागे…

12 hours ago

जिल्ह्यातील धरणांतून 1,44,053 क्यूसेक विसर्ग

धरण समूहात 47 टक्के; गंगापूर धरणात 56 टक्के पाणीसाठा नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात गेला महिनाभर…

12 hours ago

रेल्वे थांबवणार्‍यांकडून 42 हजारांचा दंड वसूल

चेन खेचल्याने वीस दिवसांत 98 गाड्यांना विलंब नाशिकरोड : प्रतिनिधी रेल्वेची विनाकारण चेन ओढण्यामुळे 1…

12 hours ago

…तर अभिजात मराठी ज्ञानभाषा, जनभाषा

सध्या सुरू असलेल्या पहिलीपासूनच्या त्रिभाषा सूत्रासंदर्भात आपण सर्व मराठी बांधवांनी जाणून घ्यायला हवे आपल्या मराठी…

12 hours ago

दागिन्यांसाठी महिलेची हत्या

पारोळा : एका अनोळखी महिलेच्या डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आली होती. यानंतर महिलेचा मृतदेह…

13 hours ago

कालव्यात फेकलेल्या कचर्‍यामुळे आरोग्य धोक्यात

अभोणा ग्रामपालिकेचे दुर्लक्ष, कचरा डेपोसाठी जागा नसल्याचा जावईशोध अभोणा : प्रतिनिधी देशभर स्वच्छ भारत मिशनचा…

13 hours ago