उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे यांचे गंभीर आरोप
नाशिक : प्रतिनिधी
अंबड इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स (आयमा) असोसिएशनची निवडणूकदेखील महापालिकेप्रमाणेच चांगलीच गाजणार आहे. दिलेला शब्द पाळला नाही म्हणूनच इच्छुकांनी उद्योजक एकता पॅनलची स्थापना केली आहे. छाननीमध्ये आमचे उमेदवारी अर्ज विविध मार्गाने बाद ठरवायचे प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. दबाव आणून आमच्या पॅनलमधील विकास माथूर यांना माघार घ्यायला लावल्याचा गंभीर आरोप नुकत्याच स्थापन झालेल्या उद्योजक एकता पॅनलचे संस्थापक राजेंद्र पानसरे यांनी केला आहे.
कुणालाही विश्वासात न घेता ललित बूब यांना पुन्हा अध्यक्षपदासाठी संधी देण्याची माहिती प्रसारमाध्यमांना देण्यात आली. तरीपण आपला ग्रुप कुठेही तुटायला नको म्हणून मी त्यांच्याबरोबर निवडणूक प्रक्रियेत राहिलो. 24 तासांमध्ये संपूर्ण ताकदीने पॅनल उभे केले. परंतु, आमच्या उमेदवारांवर माघार घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणत आहे, असा गंभीर आरोप राजेंद्र पानसरे यांनी केला आहे.
30 जानेवारीला मतदान तर 31 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. पदाधिकार्यांसह 21 जागांसाठी 2246 सभासद मतदान करणार आहेत. 1 फेब्रुवारी रोजी होणार्या सभेत नूतन कार्यकारिणीकडे सत्तेची सूत्रे प्रदान करण्यात येणार आहेत.
पॅनल स्थापन; आता माघार नाही
मी कुठल्याही परिस्थितीत अध्यक्षपदासह पॅनलच्या इतर उमेदवारांची माघार घेणार नसून, पूर्ण ताकदीने पॅनलला घेऊन ही निवडणूक लढणार आहे. अध्यक्षपद सलग दुसर्यांदा देण्याची कुठलीही परंपरा नसताना यांना कशासाठी हे अध्यक्षपद पुन्हा द्यायचे आहे?
– राजेंद्र पानसरे, संस्थापक, उद्योजक एकता पॅनलसर्व इच्छुकांच्या संमतीनेच निर्णय
सर्व इच्छुकांची बैठक घेतली. त्यात सर्वांनी मला आणि माजी अध्यक्षांना अधिकार दिला. त्यानंतर सर्वानुमते आम्ही ललित बूब यांना पुन्हा अध्यक्ष करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
– ज्ञानेश्वर गोपाळे, बीओपीपी, चेअरमन, आयमा
AIMA election second panel entry