नाशिक

आयमाच्या पुढाकाराने मंगळवारी रस्ते वाहतूक सुरक्षेबाबत चर्चासत्र

अतिरिक्त पोलिस महासंचालक सरंगल उपस्थित राहणार

नाशिक : प्रतिनिधी  रस्ते अपघात कमी व्हावेत तसेच त्यात मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांची संख्या शून्यावर यावी आणि वाहतूक व्यवस्था सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठी अंबड इंडस्ट्रीज अंड मॅन्युफॅक्चर असोसिएशन(आयमा)च्या पुढाकाराने मंगळवार दिनांक 17 मे रोजी दुपारी 3.30 वाजता आयमाच्या रिक्रिएशन हॉलमध्ये जनजागृती मोहीम व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ यांनी दिली.
या कार्यक्रमात नासिक फर्स्ट, ट्रॅफिक एज्युकेशन,नाशिक महानगरपालिका,नासिक पोलिस, स्वयंसेवी संस्था रिसिलियंट इंडिया यांचाही सक्रिय सहभाग आहे. चर्चासत्रात अतिरिक्त पोलिस महासंचालक कुलवंतकुमार सरंगल,पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे,पोलिस अधीक्षक सचिन पाटील,भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प अधिकारी बी.एस.साळुंखे, पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौघुले,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ए.बी.शिंदे,अंबडचे पोलिस निरीक्षक भगिरथ देशमुख, सातपूरचे पोलिस निरीक्षक चव्हाण, आयमाचे सरचिटणीस ललित बूब,बीओटी चेअरमन धनंजय बेळे,आयमाच्या रस्ते वाहतूक सुरक्षा नियोजनाचे अध्यक्ष गौरव धारकर आणि रिसिलियंट इंडियाचे राजीव चौबे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत,असेही निखिल पांचाळ यांनी पुढे नमूद केले.

Ashvini Pande

Recent Posts

फॅशन वीकचे 5 टॉप ट्रेंड्स

फॅशन वीक म्हणजे फक्त डिझायनर कपडे, कॅमेर्‍यांचे फ्लॅश आणि रॅम्पवॉक एवढ्यावरच मर्यादित नसते, तर ती…

13 hours ago

स्टायलिश फुटवे

1. आरामदायक फुटवेअर निवडा उन्हाळ्यात पायांना घाम येणे आणि दुर्गंधीचा त्रास होऊ शकतो. म्हणून अशा…

14 hours ago

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

अहिल्यादेवी होळकर म्हणजे तुम्हा-आम्हा सर्वांच्या मनात असणारी ती प्रतिमा की, ज्यात सात्त्विकता, सुशीलता, शीतलता, पवित्रता,…

14 hours ago

करदात्यांनी पालिकेच्या झोळीत टाकले 74 कोटी

जूनमध्ये पाच टक्केच सवलत नाशिक : प्रतिनिधी महापालिका प्रशासनाकडून दरवर्षीप्रमाणे नियमित करदात्यांसाठी एप्रिल ते जून…

14 hours ago

युवा शेतकरी दाम्पत्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

नळवाडपाडा येथील हृदयद्रावक घटना दिंडोरी : प्रतिनिधी तालुक्यातील नळवाडपाडा येथे घराच्या छतास लोखंडी पाइपला शिकार…

14 hours ago

दुष्काळी येवल्यातून चार हजार टन द्राक्ष युरोपात!

चारशे शेतकर्‍यांना 27 कोटींची कमाई, शेततळ्यासह पाटाच्या पाण्याची किमया नाशिक, येवला : प्रतिनिधी येवल्यातील प्रयोगशील…

15 hours ago