अजय बोरस्ते यांच्यावर शिंदे गटाने दिली ही जबाबदारी

नाशिक : प्रतिनिधी

नाशिक महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मोठी जबाबदारी देत त्यांची बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर
नाशिक जिल्हा सहसंपर्कप्रमुख पदी राजू लवटे यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, पालकमंत्री दादाजी भुसे, सचिव भाऊसाहेब चौधरी आदी उपस्थित होते.
ज्यावेळी अजय बोरस्ते यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला. त्यावेळी त्यांनी नाशिकमध्ये अभेद समजल्या जाणाऱ्या ठाकरे गटाला मोठे भगदाड पाडले. एकाच वेळी बारा माजी नगरसेवक आणि शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते आदींनी बोरस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे गटात प्रवेश केला. ठाकरे गटात जिल्हा संपर्क प्रमुख असलेले भाऊसाहेब चौधरी यांना शिंदे गटात गेल्यावर त्यांची सचिव पदी नियुक्ती करून बढती देण्यात आली होती. त्यानंतर बोरस्ते यांना बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून मोठी जबाबदारी मिळणार असल्याचे बोलले जात होते.दरम्यान बोरस्ते यांच्यावर आगामी नाशिक महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीची जबाबदारी राहणार आहे. त्यादृष्टीने पक्ष वाढीचे आव्हान असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *