मुंबई: राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे, 1 वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस मध्येही उभी फूट पडली असून अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली30 आमदार सरकारला पाठिंबा देणार आहेत, विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचा देखील अजित पवार यांच्या बंडाला पाठिंबा आहे. आज सायंकाळी अजित पवार यांच्या सह 9 जण सरकारमध्ये मंत्री पदाची शपथ घेणार आहेत, राज्याला आता दोन उपमुख्यमंत्री मिळणार आहे, विशेष म्हणजे महाविकास आघाडी मध्ये अजित पवार निधी देताना अन्याय करत होते असा आरोप करून सत्तेतून बाहेर पडलेल्या शिंदे गटाचे आमदार आता पुन्हा अजित दादा पवार यांच्यासोबत सत्तेत एकत्र आले आहेत, गेल्या अडीच वर्षात चौथ्यांदा राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत, पहाटेच्या शपथ विधी नंतर महाविकास आघाडी चा त्यानंतर एकनाथ शिंदे आणि फडणवीस आणि आता पुन्हा राष्ट्रवादी, भाजप आणि शिंदे गट असा एकत्रित मंत्रिमंडळ अस्तित्वात येणार आहे,
अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी पाहा व्हिडीओ सिडको।…
सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…
पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…
मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…
नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…
जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…