शिवसेना फुटीत अजितदादांचा मोठा हात; मंत्री गिरीश महाजन यांच्या दाव्याने खळबळ

नाशिक : प्रतिनिधी
शिवसेनेचा मोठा गट भाजपाकडे येण्यात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा मोठा हात होता. असा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये बोलताना केला. राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार हे सद्या नाराज असल्याची चर्चा असतानाच गिरीश महाजन यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.
उद्धव ठाकरे यांना आगामी काळात आणखी धक्के बसणार आहेत. अनेकजण त्यांची साथ सोडणार असून, सकाळच्या भोंग्याशिवाय त्यांच्यासोबत कुणीच राहणार नाही, अशी टीका त्यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता केली. नाशिकमध्ये भाजपा व्यापारी आघाडीच्या कार्यक्रमाला ते आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
उद्धव ठाकरे यांना त्यांच्याच पक्षातील आमदार, खासदार कंटाळले आहेत. मनीषा कायंदे पाटील या शिंदे गटात येत आहेत. भविष्यात आणखी काही जण त्यांची साथ सोडणार आहेत.
जिल्हा नियोजन निधीच्या वाटपात कोणताही दुजाभाव केला नसेल असे म्हणत त्यांनी पालकमंत्री दादा भुसे यांची पाठराखण केली. महाविकास आघाडीच्या काळात अजित दादा पवार हे निधी वाटप कशाप्रकारे करीत होते. हे एकदा विरोधकांनी पाहावे, असे म्हणत त्यांनी कॉंग्रेस राष्ट्रवादीकडून होणार्‍या निधी वाटपासंदर्भातील आरोपांना उत्तर दिले.

मंत्रिमंडळ विस्तार लवकरच
राज्यात रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असला तरी कुणाला घ्यायचे आणि कुणाला वगळायचे याचा अधिकार सवर्र्स्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे. दोन्ही नेेते नुकतेच दिल्लीला जाऊन आले आहेत. फक्त नावे आणि खाती फायनल होणे बाकी आहे, असे ते म्हणाले.
ठाकरेंनी भूमिका जाहीर करावी
वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर हे नुकतेच औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहून आले. याबाबत उद्धव ठाकरे यंनी आपली भूमिका जाहीर करावी. असे आवाहनही महाजन यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *