पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांची
‘एसीबी’ चौकशी करा !
– विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांची मागणी
नाशिक – (विशेष प्रतिनिधी)
ठाण्यात अनेक वर्षांपासून कार्यरत असणारे व मुळचे नाशिककर असणारे पोलिस निरीक्षक शेखर बागडे राज्याचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांच्या रडारवर आले आहेत. बागडे यांनी कोट्यावधी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता गोळा केल्याचा आरोप करताना नाशिकमधील मालमत्तेची यादीच वाचून दाखवली. बागडे विरोधात उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करणार असून याप्रकरणात ‘एसीबी’ चौकशी व्हावी अशी मागणी पवार यांनी केली आहे.
राज्यातील बहुचर्चित जाहिरात प्रकरणावरून विरोधी पक्ष नेत्यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन हल्लाबोल केला. मात्र त्यात बागडे प्रकरणाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. डोंबिवलीत भाजपा पदाधिकारी नंदू जोशी यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजपा-शिवसेना युतीत ठिणगी पडली असून त्याचा केंद्रबिंदु पोलिस निरीक्षक बागडे ठरले आहेत.
बागडे यांच्या मालमत्तेची यादी वाचून दाखवताना
शेखर बागडे ठाणे जिल्ह्यात काम करतोय, त्याने मोठी मालमत्ता निर्माण केली आहे, असा आरोप अजित पवारांनी केला. “एक पोलीस एवढी बेहिशोबी मालमत्ता कशी काय गोळा करू शकतो? सरकारने यासंदर्भात चौकशी करावी”, असं अजित पवार म्हणाले. वरिष्ठ पोलीस निरिक्षण शेखर बागडे यांनी जी बेहिशोबी मालमत्ता जमा केली त्याबाबत ‘एसीबी’ चौकशी व्हावी, असे पवार म्हणाले.
—————————————————-
२९ कोटींच्या मालमत्तेची यादी व्हायरल
वादग्रस्त ठरलेले पोलिस निरीक्षक शेखर बागडे हे मुळचे भगूरचे असून त्यांनी नाशिकसह दहशतवाद विरोधी पथक ठाणे आदी ठिकाणी सेवा बजावली आहे. मात्र डोंबिवलीतील मानपाडा पोलिस ठाण्यातील कारकीर्दीत त्यांच्यावर बालंट ओढावले आहे. बागडे यांच्या बेहिशेबी मालमत्तेची यादी व्हायरल झाली असून हीच यादी विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषदेत वाचून दाखवल्याचे बोलले जात आहे.
या यादीत नाशिकमधील सुमंगल रेसिडेन्सी (महात्मानगर) येथील सदनिका, देवळाली कॅम्प येथील व्यावसायिक मालमत्ता, तिरुमला हाईटस् (रविवार पेठ) येथील सदनिका व दुकान, रिद्धी सिद्धी कन्स्ट्रक्शनमधील भागीदारी, भगूरसह शेनित (इगतपूरी) शेतजमीन, सिन्नर-घोटी मार्गावरील फार्महाऊस, देवळाली कॅम्प येथील बंगला, ठाण्यातील मालमत्ता तसेच बँकातील जमा रक्कम व ठेवींचा उल्लेख आहे. ही मालमत्ता व्हायरल झालेल्या यादीनुसार २९ कोटी ५२ लाखाहून अधिक किंमतीची आहे.
व्हायरल झालेली मालमत्ता यादी
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…