नाशिक: प्रतिनिधी
कळवण येथे जात असताना उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न कांदा आणि टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी केला, वणी येथे अचानक झालेल्या या प्रकाराने यंत्रणेची धावपळ उडाली.
गेल्या काही दिवसांपासून कांदा आणि टोमॅटो दरात सातत्याने घसरण होत आहे. दोनच दिवसांपूर्वी दिंडोरीतील शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून निषेध नोंदवला होता. काल कळवण येथे जात असताना वणी येथे जमलेल्या शेतकरयांनी अजित दादा पवार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. तसेच काळे झेंडे दाखवले. यावेळी घोषणाबाजी करण्यात आली.