अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे मंत्री शरद पवार यांच्या भेटीला

राजकारणात नवा ट्विस्ट
अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे मंत्री शरद पवार यांच्या भेटीला
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटी नंतर अजित पवार यांच्यासह9 मंत्री सरकारमध्ये सहभागी झाले असतानाच आज राजकारणात नवा ट्विस्ट आला, राष्ट्रवादी चे सर्व मंत्री शरद पवार यांच्या भेटीला वाय बी चव्हाण सेन्टर मध्ये गेले,
पंधरच दिवसांपूर्वी अजित पवार यांच्यासह9 जणांना मंत्री करण्यात आले, त्यानंतर खाते वाटप झाले, उद्या पासून विधिमंडळ अधिवेशन सुरू होत आहे, त्यात आज सगळे मंत्री शरद पवार यांच्या भेट घेण्यासाठी गेल्याने राजकीय मंडळींच्या भुवया उंचावल्या आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, अनिल पाटील धर्मराव बाबा पाटील, संजय बनसोडे, नरहरी झिरवळ यांच्यासह सर्वच मोठे नेते शरद पवार यांना भेटायला गेले.  विशेष म्हणजे दोन्ही गटाचे नेते एकमेकांना पाण्यात पाहत असताना या घडामोडी मुळेनेमके काय राजकारण शिजतेय याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Bhagwat Udavant

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

11 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

11 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

11 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

11 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

12 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

12 hours ago