नवी दिल्ली: अजित पवार गटाला सुप्रीम कोर्टाने आज जबर धक्का दिला. अजित पवार गट हीच खरी राष्ट्रवादी म्हणून निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या शरद पवार यांच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती सूर्यकांत आणि के.व्ही, विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली, अभिषेक मनू सिंघवी यांनी अजित पवार गट शरद पवार यांचा फोटो बॅनरवर वापरत आहे त्यामुळे त्यांना बंदी घालावी अशी मागणीकरत या संदर्भात पुरावे दिले, यावर कोर्टाने अजित पवार गटाला फोटो वापरण्यास मनाई केली तसेच चिन्हही वापरू नये असे निर्देश दिले.