अक्षय आनंदा’ची सोशल मीडियावर रौनक

नाशिक ः प्रतिनिधी
अक्षय तृतीया आणि रमजान ईद एकाच दिवशी आल्याने हिंदू आणि मुसलमान धर्मीयांनी एकमेकांना शुभेच्छा संदेश देत अक्षय आनंदाची रौनक अनुभवली. त्यामुळे सध्याच्या धार्मिक तेढ निर्माण करणार्‍या नेते, कार्यकर्त्यांना एकात्मतेचा संदेश व्हायरल करून मजहब नही सिखाता आपस मे बैर रखना.. असा संदेशच जणू दिला.
देशात अनेक जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. भारतात विविध धर्म, प्रांत असून, सण-समारंभ, जातीय सलोखा, एकोपा अनेक कठीण प्रसंगी अनुभवला आहे. परंतु, सध्या दिवसागणिक राजकीय वातावरणात राजकारणी, नेतेमंडळींच्या तोंडी अर्वाच्च भाषा, शिवीगाळ, धार्मिक मुद्दे आदींचे वारंवार भाषणे ठोकून एकमेकांचे घोटाळे बाहेर काढण्यात मग्न असल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या महाभयंकर संकटातून बोध घेऊन सण, उत्सवात,
सुखदुःखात एकमेकंाना तात्काळ शुभेच्छा देण्याचे प्रभावी माध्यम म्हणून सोशल मीडियाचा वापर केला जातो. कोणत्याही घटना किवा प्रसंगाची तात्काळ माहिती समाजमाध्यमाद्वारे व्हायरल करून जगाच्या कानाकोपर्‍यात पोहचविली जाते.
त्यामुळे संवेदनशील माध्यम म्हणूनही सोशल मीडियाकडे पाहिले जाते. त्यामुळेच व्हॉट्स्ऍप ग्रुप, फेसबुक, इन्स्टा, ट्विटर आदी माध्यमांवर आक्षेपार्ह काही पोस्ट आल्यास त्याचा परिणाम तात्काळ जनतेत दिसून येतो. जनतेवर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पाडणार्‍या गोष्टींमुळे काही अनुचित घटना घडण्याची शक्यता असल्याने व्हॉट्सऍप ग्रुप आणि इतर ऍप्स्वर नियम घालण्यात आले आहेत. त्यामुळे धार्मिक तेढ किंवा देशद्रोही पोस्ट टाकण्यावर अंकुश लावण्यात आला. चुकून कोणी अशा पोस्ट टाकल्या तर दंड आणि शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. काल अक्षय तृतीया आणि रमजान ईद सण एकाच दिवशी आल्यामुळे हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा देत हा एकोपा अक्षय राहावा, असाच संदेश जणू यानिमित्ताने देण्यात आला.

 

हे ही वाचा : अहमदनगर महाकरंडक मध्ये अऽऽऽय…! ठरली सर्वोत्कृष्ट एकांकिका

भेंडवळची भविष्यवाणी: यंदा पाऊस चांगला; कोरोना जाणार

 

Devyani Sonar

Recent Posts

घरात घुसला, अंगावर पेट्रोल टाकून पेटवले, नंतर बायको- सासूलाही पेटवले

  घरात घुसला, अंगावर पेट्रोल टाकून पेटवले अन नंतर केले असे काही...     नाशिक: …

17 hours ago

भाजपाचा पद्मनाभ मंदिरातील सोन्यावर डल्ला मारण्याचा डाव

  काँग्रेस  मेळावा नाशिक : प्रतिनिधी वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा…

19 hours ago

अभोण्यात कांदा आवक घटली

कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अभोणा उपबाजारात शेतकर्‍यांंनी गुरूवारी सुमारे 700 ट्रँक्टर मधून 15 हजार…

20 hours ago

नाशकातील शिवसैनिक जागेवरच : खा.संजय राऊत

नाशिक : प्रतिनिधी गेल्या तीन चार महिन्यांपासून हा तिकडे चालला तो तिकडे चालला अशा अफवा…

20 hours ago

विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात 39 हजार मतदारांची वाढ

नाशिक : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पाठोपाठ मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर केला होता.आगामी स्तानिक स्वराज संस्थेच्या…

20 hours ago

भाजपाचा पद्मनाभ मंदिरातील सोन्यावर डल्ला मारण्याचा डाव

नाशिक : प्रतिनिधी वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न असला…

20 hours ago