प्रभाग ९ मध्ये भाजपाचे चारही उमेदवार विजयी

प्रभाग ९ मध्ये भाजपाचे चारही उमेदवार विजयी
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ मध्ये भाजपाने मोठे यश मिळवले आहे. या प्रभागातील चारही जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी झाले असून पक्षाने एकहाती वर्चस्व सिद्ध केले आहे.
विजयी उमेदवारांमध्ये दिनकर पाटील, अमोल पाटील, संगीता घोटेकर आणि भारती धिवरे यांचा समावेश आहे. मतमोजणी पूर्ण होताच निकाल जाहीर करण्यात आले आणि भाजपाच्या विजयाची घोषणा होताच कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला.
मतमोजणी केंद्राबाहेर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत विजयी घोषणा दिल्या. ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांची आतषबाजी करत आणि ‘भाजपा जिंदाबाद’च्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत विजयाचा आनंद साजरा केला.
या निकालामुळे प्रभाग ९ मध्ये भाजपाची संघटनात्मक ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून आगामी काळात विकासकामांना गती देण्याचे आश्वासन विजयी उमेदवारांनी दिले आहे. नागरिकांनी दिलेल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी प्रभागातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि रस्ते विकास यांना प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *