नाशिक

ठेकेदाराकडून 1 कोटीची लाच मागितल्याचा आरोप

नाशिक कृषी बाजार समितीतील प्रकार; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार अर्ज

पंचवटी : प्रतिनिधी
पेठ रोडवरील शरदचंद्र पवार मार्केट यार्ड परिसरातील व्यापारी संकुलातील बिल पास करून पुढील बांधकाम करण्यासाठी विनायक माळेकर यांनी तब्बल एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप ठेकेदार गणेश पगार यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार अर्ज दाखल केला असून, योग्य ती कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती ही काहीना काही कारणाने नेहमीच चर्चेत राहिली आहे. त्यातच आता पुन्हा एकदा ती
चर्चेत आली असून, ठेकेदाराने गंभीर आरोप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गणेश बाळकृष्ण पगार हे नोंदणीकृत ठेकेदार आहेत. मागील वर्षी 9 सप्टेंबर 2024 रोजी शरदचंद्रजी पवार मार्केट यार्ड येथील व्यापारी संकुल क्रमांक चारचे उर्वरित बांधकाम करण्याचे काम मिळाले होते. त्या अनुषंगाने कार्यारंभ आदेशदेखील प्राप्त झाल्यानंतर कामकाज सुरू केले होते. तसेच जवळपास 40 टक्के कामकाज पूर्ण झाले असून, संबंधित बिलदेखील प्राप्त झाले आहे. मार्च 2025 मध्ये बाजार समितीत सत्ता परिवर्तन झाले. एप्रिल महिन्यात बिल सादर केले असता, बाजार समितीचे उपसभापती विनायक माळेकर यांनी सुरू असलेले बांधकाम थांबविण्यास सांगितले. सदर काम तू कोणाला विचारून करतो. यानंतर तुला बिल कसे मिळते हे बघतो, अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्या जातात, असे अर्जात नमूद केले आहे. त्यामुळे माळेकर यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी सदर कामाचे बिल तुला हवे असेल तर पुढच्या कामाचे एक कोटी रुपये द्यावे लागतील. त्यात पन्नास लाख रुपये अ‍ॅडव्हान्स तर बिल पास झाल्यानंतर 50 लाख रुपये द्यावे लागतील, असे तक्रार अर्जात ठेकेदार गणेश पगार यांनी म्हटले आहे. या प्रकारामुळे मानसिक तणावासह आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे, तरी आपल्या स्तरावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीदेखील तक्रार अर्जात केली आहे.

          बदनामी व्हावी म्हणून केलेला प्रकार

ठेकेदार गणेश पगार यांनी मला रात्री 2 ते 2.30 वाजेच्या सुमारास मला व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज टाकून मला त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मी गंगापूर पोलीस ठाण्यात ठेकेदार पगार यांच्याविरोधात तक्रार केली. मी त्यांच्याकडे पैसे मागितले म्हणून असा काही प्रकार घडलाच नाही. तर मी तक्रार केल्याने ब्लॅकमेल करण्याच्या आणि माझी बदनामी करण्याच्या दृष्टीने हा प्रकार केला, असा अर्ज केला आहे.
-विनायक माळेकर, उपसभापती, नाशिक कृउबा

 

Gavkari Admin

Recent Posts

वाजगाव ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव एकमताने मंजूर

विविध विषयांवर चर्चा; थकबाकी वसुलीसाठी धोरण राबविण्याचा निर्णय देवळा ः प्रतिनिधी वाजगाव येथील ग्रामसभेत गावात…

3 hours ago

संवर्ग एकमधील शिक्षक 100 टक्के नेमणुकीस नकार

जानोरी ग्रामसभेत ठराव; तसा शिक्षक दिल्यास हजर न करून घेण्याचा पवित्रा दिंडोरी : प्रतिनिधी जिल्हा…

3 hours ago

पीकविमा भरपाई न दिल्यास उपोषण

वंचित दोनशे शेतकर्‍यांचा इशारा; कंपनी प्रतिनिधींनी सर्वेक्षण केले नाही कंधाणे : वार्ताहर कंधाणे येथील खरीप…

3 hours ago

गणेशोत्सवासाठी बाजारात उत्साहाचे वातावरण

शासनाच्या बंदीनंतरही सर्वत्र प्लास्टिकच्या फुलांचाच बोलबाला नाशिक ः प्रतिनिधीअवघ्या आठ दिवसांवर आलेल्या गणेश चतुर्थीसाठी बाजारपेठ…

3 hours ago

इच्छुक लागले तयारीला!

गणेशोत्सवातील राजकीय उत्सव नाशिक : प्रतिनिधी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने इच्छुकांकडून गणेशोत्सवाचा मुहूर्त…

4 hours ago

जिल्ह्यात जुलैअखेर मलेरियाचे 28 रुग्ण

आज जागतिक मच्छर दिन नाशिक : देवयानी सोनार जिल्ह्यात जानेवारी ते जुलै 2025 या सात…

4 hours ago