नाशिक ः प्रतिनिधी
संक्रातीला आवर्जुन काळ्या रंगाचे कपडे आणि हलव्याचे दागिने घालण्याची परंपरा असून, यंदा हलव्याच्या दागिन्यांसह फुलांच्या दागिन्यांचीही क्रेझ असल्याने मागणीत वाढ झाली आहे. काळ्या रंगाच्या कपड्यांवर हलव्याचे दागिने आणि फुलांची ज्वेलरी खुलून दिसते. त्यामुळे महिलांवर्गाची पसंती मिळत आहे.
भावी वधूवरांसाठी, नववधू तसेच लहान बाळांच्या पहिल्या संक्रातीला काळ्या रंगाचे कपडे,हलव्याचे दागिने,तिळगुळ आदी आवर्जून भेट म्हणून दिले जातात.त्यामुळे हलव्याच्या दागिन्यांना गेल्या काही वर्षात मागणी वाढली आहे.
राज्यभरात हलव्याच्या दागिन्यांना मोठी मागणी आहे. शहरातील विविध भागात हलव्याचे दागिने बनविले जातात. अनेक दुकानांमध्ये दागिने ऑडर देऊन बनवून घेतले जातात. रेडीमेड दागिन्यांनाही पसंती मिळते.
हलव्याच्या दागिने तीळ,काटेरी हलवा यांच्या पासून पाकात बनविले जातात.नथ,राणीहार,कानातले,बाजूबंद,बांगड्या,मंगळसूत्र,तोडे,कमरपट्टा आदी दागिने बनविले जातात.ङ्गुलांची ज्वेलरी कृत्रीम ङ्गुले,मोती,चमकी,खड्यांची लेस,वेलवेट कापड आदींपासून बनविले जातात.
संक्रातीचा सण भावी वधू,नववधू,लहानबाळांसाठी खास असल्याने आवर्जून भेट देण्यात येते.लहानमुलांसाठी बासरी,मुकुट,बाजूबंद,कमरपट्टा,तोडे आदी बनविण्यात येतात.संक्रातीला लहानमुलांचे बोरन्हान केले जाते.त्यासाठी आवर्जून हलव्याचे दागिने खरेदी केले जातात.
मनमाडला बंदी असलेल्या नायलॉन मांजाने सिलेंडर वाटप करणारा तरुण जखमी मनमाड : प्रतिनिधी संपूर्ण राज्यात…
इंदिरानगर : वार्ताहर पाथर्डीफाटा येथील चौफुली नजीक दुचाकीहून जाणाऱ्या बावीस वर्षीय युवकाचा गाळ्यात मांजा अडकून…
सिडकोत नायलॉन मांजा ने घेतला युवकाचा बळी नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात नायलॉन…
लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद लासलगाव:-समीर पठाण केंद्र सरकारने…
नाशिक मविप्र मॅरेथॉन-२०२५'चा विजेता ठरला मुंबईचा डॉ. कार्तिक करकेरा मागीलवर्षीच्या स्पर्धेतील विक्रम मोडीत, फूल मॅरेथॉनचे…
ऐकावे ते नवलच! 36 वर्षाच्या विवाहितेचा पंधरा वर्षाच्या मुलाला घेऊन पोबारा सिडको : विशेष प्रतिनिधी असे…