आश्चर्यचम ! गुलमोहराच्या झाडात पाण्याचा झरा

नाशिक- वणी रस्त्यावर ओझरखेड जवळ एका गुलमोहराच्या झाडाच्या मध्यातुन अचानक झर्‍यासारखे पाणी येऊ लागले. ही वार्ता परीसरात पसरली. बघता बघता तिथे गर्दी झाली. अनेकांनी हा चमत्कार असल्याचे सांगितले. काहींनी मोबाईल मध्ये चित्रण केले. तर काहींनी तीर्थ समजुन बाटलीत ते पाणी भरून घरी नेले. सोशल मिडीयात सदरची चित्रफित पाहुन दुरून लोक येऊ लागले. कुणीही या मागचे कारण न जाणुन घेता चमत्कार समजून त्यावर विश्वास ठेवला. परीसरात या निमीत्ताने उलटसुलट चर्चेला उधाण आले. मात्र या बाबतीत खरे कारण समजल्यावर गर्दी थांबली. अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन महाराष्ट्र अंनिसचे प्रधान सचिव डाॅ.टी.आर.गोराणे व राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केले आहे.

” सदर झाडाखालून पाईपलाईन गेली आहे. पाईपलाईन टाकल्यानंतर हे झाड लावल्याचे समजते. झाडाची मुळे खाली वाढून पाईपलाईन मध्ये शिरली . झाड जिर्ण होताच पाण्याच्या दाबामुळे मुळ ,खोड यातुन पाणी वरती आले. पाईपलाईन पाण्याचा प्रवाह थांबविला असता झाडातून पाणी येणे थांबते,याचा अर्थ हा चमत्कार नाही लोकांनी अफवांवरविश्वास ठेऊ नये ”
– कृष्णा चांदगुडे.
राज्य कार्यवाह, महाराष्ट्र अंनिस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *