अंबड परिसरातील गोडाऊनला  आग

अंबड परिसरातील गोडाऊनला  आग

सिडको : प्रतिनिधी
अंबड परिसरातील चुंचाळे भागात आनंदवाटीका गृहप्रकल्प जवळ असलेल्या भंगाराच्या गोदामाला बुधवारी रात्री दोन वाजता अचानक आग लागल्याने एकच धावपळ उडाली.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिका हद्दीतील सर्वच अग्निशमन केंद्रावरचे आठ ते नऊ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या.
आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम केले. यावेळी अंबड सातपूर व चुंचाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते. आगीमुळे कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नसून वित्त हानी मात्र मोठ्या प्रमाणात झाल्याचे समजते.
दत्त नगर रोड ,दातीर नगर , आनंद वाटिका बिल्डिंग जवळील , खान स्क्रप मटेरियल लाकड़ी फळ्यापासून इंडस्ट्रियल बॉक्स बनविणे च्या रॉ- मटेरियल ला मोठी आग पहाटे 2:15 वाजता लागलेली होती . सिडको फायर स्टेशन ला कॉल आला होता , सिडको केंद्राचे लि. फायरमन मुकुंद सोनावणे व सुनिल धुगे व वाहन चालक ईस्माईल काझी यांनी घटना स्थळी जावून आग मोठी असल्यामुळे केंद्रावर फोन करून आजुन मदतीची आवश्यकता असल्याचे फोन ऑपरेटर के के पवार यांना सांगितले त्यानुसार शहरातील इतर अग्निशमन केद्रांवरून फायर स्टाफ व वाटरटेंडर व बाऊजर , मेगा बाऊजर घटना स्थळी पोहचले व सर्वनी एकत्र मिळून आगीवर पाणी मारून आग आटोक्यात आणली व शेजारील प्लास्टिक ( भंगार माल )गोडावून ला आग लागणे पासुन वाचविले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *