शिक्षक नेते अंबादास वाजे यांचे हृदयविकाराने निधन
नाशिक: प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अंबादास वाजे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. सिन्नर तालुक्यात शिक्षक म्हणून आपल्या नोकरीला प्रारंभ केलेले वाजे हे सिन्नर येथील शाळेत कार्यरत असतानाच शिक्षक नेते बनले, त्यानंतर शिक्षक संघटनेचे पदाधिकारीम्हणून काम करत असताना शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आंदोलने करून शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतःला संघटनेच्या कार्यत झोकून दिले. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.