भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने
नाशिकरोड ः वार्ताहर
नाशिकरोड परिसरात साजरी करण्यात आली. नाशिकरोड बसस्थानकासमोरील पूर्णाकृती पुतळ्याजवळ जयंतीच्या पूर्वसंध्येला आंबेडकरी जनता परिसरातील विविध भागातून एकत्र आलेली होती. रात्री बारा वाजता सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष अनिकेत गांगुर्डे, मुकेश वीर यांनी डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
भारतीय बौद्ध महासभेतर्फे भीमवंदना घेतली. उपस्थितांनी त्रिशरण, पंचस्तुती, भीमस्तुती आणि भीम स्मरणाचे सामुदायिक पठण केले. अनेकांनी डॉ.आंबेडकरांना पुष्पांजली अर्पण केली. विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरही सुनील कांबळे, अतुल भावसार, बाळासाहेब गांगुर्डे, आप्पा भालेराव, अक्षय बर्वे यांनी बाबासाहेबांच्या विचारांना उजाळा दिला. पुतळ्यास खा. राजाभाऊ वाजे, पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, उपआयुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ.सचिन बारी, नाशिकरोड व उपनगर पोलीस ठाण्याचे वपोनि अशोक गिरी, जितेंद्र सपकाळे, मनपा विभागीय अधिकारी यांनीही पुतळ्याचे पूजन केले. सोमवारी सायंकाळी जेलरोड, उपनगर, सामनगाव रोड, चेहडी एकलहरारोड, देवळालीगाव विहितगाव, जय भवानी रोड, रोकडोबावाडी भागातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरील आकर्षक चित्ररथ काढण्यात आले होते.
बिटको चौक ते आंबेडकर पुतळापर्यंत विविध मंडळांनी राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या चित्ररथाचे स्वागत केले. यावेळी मोठ्या प्रमाणात आंबेडकरी जनता उपस्थित होती.
दोन ठिकाणी पूजन झाल्याने हा जनसागर विभागला होता.
त्यामुळे पोलिसांवरील ताणही कमी झाला होता.
यावेळी मनोहर जाधव, सुचित्रा गांगुर्डे, राहुल पगारे, विजय पवार, संयोजक समितीचे संजय भालेराव, भारत निकम, समीर शेख, हरीश भडांगे, अमोल पगारे, शेखर भालेराव, सनी वाघ, आकाश भालेराव, संतोष पाटील, रामबाबा पठारे, नयना वाघ, संतोष कांबळे, किशोर खडताळे, बाळासाहेब सोनवणे, राजाभाऊ वानखेडे, चंद्रकांत भालेराव, संजय भालेराव, रोहित निरभवणे, विशाल घेगडमल, आकाश घुसळे, राजू पगारे, महेंद्र तायडे, महेंद्र साळवे, कैलास वानखेडे, बाळासाहेब जाधव, बौद्धाचार्य प्रवीण बागुल ,चावदास भालेराव, प्रभाकर कांबळे, पी.के. गांगुर्डे, बाळासाहेब भालेराव, सचिन भालेराव, भीमचंद चंद्रमोरे, महिला आघाडीच्या माधुरी भोळे, शांताबाई पगारे, सत्याबाई गाडे, विमलबाई तडवी, विमलबाई जाधव, रमेश वाघ, गणेश जाधव, दशरथ मोकळ, शरद कांबळे, देविदास वाघ, बाळकृष्ण शिंदे, मनोज खैरनार, गौतम गवारे, कृणाल कांबळे आदींनी उत्तम नियोजन केले होते.