अमित शहांचा मुंबई दौरा; वाहतूक अडवली पिंपळगाव, घोटीला

अमित शहांचा मुंबई दौरा; ट्राफिक अडवली पिंपळगाव, घोटीला

दिक्षी: सोमनाथ चौधरी

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अवजड वाहतूक थांबवल्याने पिंपळगाव बसवंत, घोटी टोल नाका, इगतपुरी जवळ रस्त्याच्या कडेला ट्रक, कंटेनर, टेम्पो यांच्या रांगा लागल्या आहेत,

गृह मंत्री अमित शाह यांच्या हस्ते  अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याच्या

पार्श्वभूमीवर मुंबईत मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर मध्यरात्री बारा वाजेपासून थांबविण्यात आल्याचे समजते..

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा असल्याने कंटेनर व अवजड वाहनांना थांबविण्यात आल्याचे बोलले जात आहे. तसेच अचानक ट्राफिक थांबाविल्याने अनेक चालक व वाहकांचे हाल होत असून पोलीस प्रशासनाकडून मात्र कुठलीही अधिकृत माहिती दिली जात नाही. त्यामुळे वाहतुकीचा पुरता फज्जा उडाला आहे.

तसेच धुळ्याहून येणारी सर्व अवजड वाहने पिंपळगाव टोलनाक्यावर थांबविण्यात आली असून लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तर दुसरीकडे अमित शहा यांचा दौरा मुंबईत असताना पिंपळगाव, घोटी, इगतपुरी येथे ट्राफिक थांबविण्याचे कारण काय, असा प्रश्न स्थानिकांकडून विचारला जात आहेत.

पाहा व्हीडिओ

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *