अजितदादांच्या अपघातप्रकरणी रोहित पवारांचा आरोप
विमान बारामतीवरून हैदराबादला जाणार होते. तिथे विमानात पुन्हा इंधन भरता आले असते. मात्र, हे विमान सुरतवरून मुंबईला येत असतानाच त्याच्या इंधन टाक्या पूर्णपणे भरल्या होत्या. या विमानात अपघाताच्या वेळी 3000 ते 3500 लिटर इंधन होते. एवढेच नव्हे, तर विमानाच्या टॉयलेटजवळ इंधनाचे अतिरिक्त कॅनही ठेवले होते. या सगळ्यात पायलटचा वापर करून अजितदादा पवार यांच्या विमानाचा अपघात घडवण्यात आला, असे आम्हाला वाटते. विमानात जास्त इंधन असेल तर मोठा स्फोट होईल, हा आमचा संशय खरा ठरताना दिसत आहे.
बारामतीच्या धावपट्टीवर उतरण्यासाठी दृश्यमानता कमी असूनही पायलट सुमित कपूर यांनी माघारी न फिरता एक गिरकी घेऊन विमान खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. किंबहुना त्यांनी विमान मुद्दाम खाली आदळले आणि स्फोट घडवून आणला, असा आरोप रोहित पवार यांनी केला.
विमानाच्या लँडिंगसाठी 5000 इतकी दृश्यमानता लागते. मात्र, बारामतीत त्यावेळी 3500 इतकीच दृश्यमानता होती. मुळात मुंबईतून उड्डाण करतानाच दृश्यमानता कमी होती. तरीही विमानाच्या उड्डाणासाठी परवानगी देण्यात आली.
यानंतरही विमानाने उड्डाण केले तरी ते बारामतीत लँड करायला नव्हते पाहिजे. त्यामुळे या अपघाताबाबत घातपाताचा संशय अधिक बळावतो, असे आ. रोहित पवार यांनी म्हटले.
कंपनीवरही गंभीर आरोप
यावेळी रोहित पवार यांनी व्हीएसआर या विमानसेवा देणार्या कंपनीवरही गंभीर आरोप केले. व्हीएसआर कंपनीचा गोपी नावाचा हँडलर मुंबईत बसतो. तो फ्लाइट प्लॅनमध्ये फेरफार करू शकतो. माझ्या माहितीनुसार, सध्या तपास सुरु असून व्हीएसआर कंपनीकडून कागदपत्रे मिळण्यात विलंब होत आहे. कारण, व्हीएसआर कंपनीकडून सध्या कागदपत्रांमध्ये फेरफार करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दिल्लीवरुन फ्लाईट प्लॅन आल्यानंतर हँडलर गोपीने त्यामध्ये बदल केले असावेत. त्यामुळे याप्रकरणाची चौकशी करताना त्यावेळी पाठवण्यात आलेले ई-मेल तपासावेत, असे रोहित पवार
यांनी म्हटले.
ब्लॅक बॉक्स, सीव्हीआरमधील तफावत
नियमानुसार सीव्हीआरमध्ये 2 तासांचा आवाज रेकॉर्ड होणे आवश्यक असताना, या विमानात फक्त 30 मिनिट रेकॉर्ड होऊ शकत होते. तसेच, भारतात 90 कोटींची हाय-टेक लॅब असताना ब्लॅक बॉक्स तपासासाठी कॅनडाला का पाठवला, असा सवाल त्यांनी केला. अपघात झाल्यानंतर चौकशीची ऑर्डर काढायला 4 दिवस का लागले, असा प्रश्न त्यांनी विचारला. तसेच, डीजीसीएच्या वेबसाईटवरून अकाउंटेबल मॅनेजरचे नाव का हटवले, असा संशय त्यांनी व्यक्त केला.
इन्शुरन्सचा संशयास्पद आकडा
विमानाची सध्याची वास्तविक किंमत 10 ते 15 कोटी रुपये असताना, त्याची इन्शुरन्स व्हॅल्यू 55 कोटी रुपये कशी होती, असा सवाल त्यांनी केला. तसेच, या विमानाची लायबिलिटी इन्शुरन्स व्हॅल्यू 210 कोटी रुपये होती. 210 कोटींपैकी पायलटला किती रुपये मिळणार होते आणि ही गोष्ट त्या पायलटला माहीत होती का? याची स्पष्टता होणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. डीजीसीएच्या वेबसाईटवरून अकाउंटेबल मॅनेजरचे नाव का हटवण्यात आले, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
पायलटच्या लायसन्सवर गंभीर आक्षेप
रोहित पवार यांनी पायलटच्या लायसन्सवर गंभीर आक्षेप घेतले आहेत. त्यांनी उदाहरण दिले की, जर तुम्ही ट्रक चालवत असाल तर तुम्हाला जेसीबी किंवा पोकलेन चालवण्याची परवानगी नसते. त्याचप्रमाणे, लेर जेट चालवणार्या पायलटला लेगेसी सारखे विमान चालवता येत नाही. त्यांनी असा आरोप केला की, कपूर आणि रोहित सिंग हे दोघेही अवैध पद्धतीने ही दोन्ही विमाने चालवत होते आणि याचे डॉक्युमेंटेशन उपलब्ध असल्याचे ते म्हणाले.
कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा आरोप
फ्लाइट प्लॅनबाबत रोहित पवार यांनी गंभीर आरोप केले आहेत. मुंबईत बसलेला गोपी नावाचा हँडलर फ्लाइट प्लॅन मॅनिपुलेट करू शकतो. सध्या कागदपत्रे मुद्दामून बनवण्याचे काम सुरू आहे. रोहित पवार यांनी निव्वळ कागदी पुराव्यांवर विश्वास न ठेवता डिजिटल पुराव्यांची मागणी केली आहे. आम्हाला कागदी डॉक्युमेंट न घेता सीसीटीव्हीच्या खाली केलेले त्या तारखेचे सीसीटीव्ही किंवा ई-मेलचे प्रूफ पाहिजेत. फक्त कागदाला कागद जोडण्याचा प्रयत्न करू नका, डिजिटल प्रूफ आम्हाला पाहिजे, ही महाराष्ट्रातल्या जनतेची मागणी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
An explosion occurred due to overfilling the plane with fuel!
कुत्र्यामुळे सुसाईड नोट लिहून बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या शहापूर: प्रतिनिधी 30 वर्षीय बँक कर्मचाऱ्याला भटक्या श्वानानं…
नुकताच फेसबुकवरील एका पेजवर डॉ. प्रज्ञावंत सरांचा लेख वाचनात आला. त्यांच्या लेखातील काही मुद्दे मनाला…
खुणावतो का मला माहेरचा तो कोपरा, जरी असला आज, माझा संसार हसरा.... बंद कुपी असते…
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तत्त्वांचा बाजार आणि सोयीच्या युतींचा सुकाळ झाला असून, एकेकाळचे कट्टर विरोधक आता…