सटाणा: प्रतिनिधी
शहरात महिलेवर चाकु हल्ला झाला आहे. आम्ही पोलिस असून तुम्ही कुठे चाललात हातातल्या सोन्याच्या बांगड्या काढा असे सांगुन हात चलाखीने त्या महिलेने दिलेल्या बांगड्या बदलवण्याचा प्रयत्न होत असल्याचे लक्षात येताच आरडाओरडा केला असता. परिसरातील नागरिक धावून आले. दोघांपैकी एक भामटा ताब्यात सापडला . त्यालानागरिकांनी बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले तर दुसरा गर्दीचा फायदा घेत पसार झाला.
नामपूर रस्त्यावरील डिव्हाइन फार्मसी काँलेज समोर ७० वर्षीय विमलबाई भदाणे या खिरमाणीला जाण्यासाठी वाहणाची वाट बघत असतांना दोन अनोळखी व्यक्ती नंबर प्लेट नसलेल्या दुचाकी वाहणावरून विमलबाई जवळ आलेत. एक महीलेवर चाकु हल्ला झाला आहे. हल्लेखोरांचा आम्ही शोध घेत आहोत. तुमच्या हातात असलेल्या बांगड्या कशाच्या आहेत. असे धमकावून विमलबाईकडे बांगड्यांची मागणी केली. त्यांनी हातातील सोन्याच्या बांगड्या काढून तोतय्या पोलिसांच्या हातात दिल्यात. त्यावर त्यांनी हात चलाखी करून दुसऱ्या बांगड्या विमल बाईंकडे देण्याचा प्रयत्न करत असतांना विमलबाईने आरडा ओरडा केला. परिसरातील नागरीक व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी धाव घेऊन तोतय्या पोलिसांना पकडण्याचा प्रयत्न केला असता एक हाती लागला तर दूसरा पळून गेला. जमावाने तोतय्या पोलिसास चोप देऊन सटाणा पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार, उप पोलिस निरीक्षक अतुल बोरसे अधिक तपास करीत आहेत.