उत्तर महाराष्ट्र

बांगड्या पळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तोतया पोलिसाला जमावाने बदडले

सटाणा:  प्रतिनिधी

शहरात महिलेवर चाकु हल्ला झाला आहे. आम्ही पोलिस असून तुम्ही कुठे चाललात हातातल्या सोन्याच्या बांगड्या काढा असे सांगुन हात चलाखीने त्या महिलेने दिलेल्या बांगड्या बदलवण्याचा प्रयत्न होत असल्याचे  लक्षात येताच  आरडाओरडा केला असता. परिसरातील नागरिक धावून आले. दोघांपैकी एक भामटा ताब्यात सापडला . त्यालानागरिकांनी बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले तर दुसरा गर्दीचा फायदा घेत पसार झाला.

नामपूर रस्त्यावरील डिव्हाइन फार्मसी काँलेज समोर ७० वर्षीय विमलबाई भदाणे या खिरमाणीला जाण्यासाठी वाहणाची वाट बघत असतांना दोन अनोळखी व्यक्ती नंबर प्लेट नसलेल्या दुचाकी वाहणावरून विमलबाई जवळ आलेत. एक महीलेवर चाकु हल्ला झाला आहे. हल्लेखोरांचा आम्ही शोध घेत आहोत. तुमच्या हातात असलेल्या बांगड्या कशाच्या आहेत. असे धमकावून विमलबाईकडे बांगड्यांची मागणी केली. त्यांनी हातातील सोन्याच्या बांगड्या काढून तोतय्या पोलिसांच्या हातात दिल्यात. त्यावर त्यांनी हात चलाखी करून दुसऱ्या बांगड्या विमल बाईंकडे देण्याचा प्रयत्न करत असतांना विमलबाईने आरडा ओरडा केला. परिसरातील नागरीक व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी धाव घेऊन तोतय्या पोलिसांना पकडण्याचा प्रयत्न केला असता एक हाती लागला तर दूसरा पळून गेला. जमावाने तोतय्या पोलिसास चोप देऊन सटाणा पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार, उप पोलिस निरीक्षक अतुल बोरसे अधिक तपास करीत आहेत.

Bhagwat Udavant

Recent Posts

राज्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हनी ट्रॅप केंद्रबिंदू या शहरात

राज्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हनी ट्रॅप केंद्रबिंदू या शहरात शहापूर/ साजिद शेख गेल्याकाही दिवसांपासून विधीमंडळात एक-…

7 hours ago

जव्हार( राजेवाडी )येथे गॅस्ट्रो साथीचे थैमान

जव्हार( राजेवाडी )येथे गॅस्ट्रो साथीचे थैमान: दोन रुग्णांचा मृत्यू, 14 रुग्णांवर   उपचार सुरू मोखाडा:   …

11 hours ago

आधी प्रेम… मग लिव्ह इन अन नंतर …

आधी प्रेम... मग लिव्ह इन अन नंतर ... शहापूर/साजिद शेख २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला अश्लील…

15 hours ago

दिंडोरी जवळ भीषण अपघातात सात जण ठार

  दिंडोरी येथील अपघातात सात ठार अपघातात तीन महिला, तीन पुरुष एक बालकाचा समावेश दिंडोरी…

21 hours ago

प्रेम अन साखरपुडा एकाशी, लग्न त्याच्याच मित्राशी… प्रेमात धोका, स्टेटस ठेवले अन् पुढे घडले…

साखरपुडा एकाशी, लग्न त्याच्याच मित्राशी प्रेमात धोका, स्टेटस ठेवले अन् पुढे घडले... सद्या प्रेमाची व्याख्याच…

3 days ago

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेश अध्यक्षपदी शशिकांत शिंदे

नाशिकरोड : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन जयंत पाटील पायउतार झाले असून,…

3 days ago