पाच हजारांची लाच घेताना मुख्याध्यापक, शिपाई जाळ्यात
सिन्नर तालुक्यातील घटना
नाशिक : प्रतिनिधी
वेतनाच्या फरक बिलाची फाईल मंजूर करण्यासाठी पाच हजारांची लाच घेताना मुख्याध्यापक आणि शिपायास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याची घटना सिन्नर तालुक्यातील रामनगर येथील आश्रम शाळेत घडली. तक्रारदार यांचा 2016 ते2023 पर्यंतच्या वेतनाची फरकाची फाईल मंजूर करून फरक काढून देण्याच्या मोबदल्यात पाच हजार रुपयांची लाच रामनगर येथील आश्रम शाळेचे मुख्याध्यापक सुनील वसंत पाटील यांनी मागितली होती, ती रक्कम शिपाई बाळू हिरामण निकम यांना देण्यास सांगितली, लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले, याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर-घारगे, अपर अधीक्षक माधव रेड्डी, वाचक पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेन्द्र सानप, हवालदार प्रफुल्ल माली, संतोष गांगुर्डे, विलास निकम यांच्या पथकाने ही कारवाई केली.
घिबली अॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…
नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…
लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…
80 फेर्या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…