सिडको : विशेष प्रतिनिधी
चाडेगांव येथील काशाई देवीच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर गावातुन जमा करण्यात येणाऱ्या लोकवर्गणीचा तसेच मागील वर्षी यात्रेसाठी खर्च झालेला निधी आणि बाकी असलेल्या निधीबाबत विचारणा केल्याचा राग आल्याने चाडेगांव विविध विकास सोसायटीचे सदस्य सचिन मानकर याने गावातील बंडु मानकर याच्यावर गोळीबार केला यात बंडु मानकर हा गंभीर जखमी झाला असून जखमी बंडु मानकर याच्यावर एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले
चाडेगाव गावात यात्रेनिमित्त बैठक सुरू होती ती बैठक आटोपल्यानंतर सर्व मित्र मानकर परीवार चाडेगाव फाट्यावरील ओम साई ढाब्यावर पार्टी साठी बसले होते त्या ठिकाणी संशयित सचिन याने स्वतःकडे असलेल्या गावठी कट्टा मधून 2 गोळ्या जवळच्या मित्र नातेवाइक बंडु मानकर याच्यावर झाडल्या असून जखमी मानकर हा सिद्धिविनायक हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहे
याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नाशिकरोड पोलीस करीत आहे
संशयित सराईत गुन्हेगार
संशयीत आरोपी सचिन मानकर हा हिस्ट्रीसीटर आरोपी असुन त्याच्याविरोधात विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा दाखल असल्याचे समजते, खंडणी, मारहाण, असे गुुुन्हे सचिन मानकरनकरकर दाखल आहेत.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…