विमान अपघाताची चौकशी होणार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामती या ठिकाणी मोठा अपघात झाला आहे. या विमान अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर राज्यभरातून हळहळ व्यक्त होत आहे. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त करत आमच्या सहकार्‍याचा जीव या विमान दुर्घटनेत गेला आहे. पाच ते सहा जणांचा मृत्यू झालेला आहे, त्यामुळे या विमान अपघाताची चौकशी नक्कीच होईल. नक्कीच झाली पाहिजे. कारण यापुढेदेखील अशा प्रकारचे अपघात होता कामा नयेत, यासाठी हे गरजेचे आहे. तसेच या अपघाताची चौकशीदेखील होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

An investigation into the plane crash will be conducted.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *