पिंपळगाव नजिक पुलावर ओमनी कारने घेतला अचानक पेट

 

लासलगाव:  प्रतिनिधी

लासलगाव शहर व पिंपळगांव नाजीक ला जोडणाऱ्या शिवनदी वरील पुलावरून जात असलेल्या एका ओमिनी कारला आग लागल्याची घटना बुधवारी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान घडली.सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेले नाही.मात्र पूर्ण कार जळून खाक झाली आहे
ही घटना घडल्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती

या बाबत मिळालेल्या माहिती नुसार ब्राम्हणगाव येथील भाजीपाल्याचा व्यवसाय करणारे सुनील कैलास पगारे यांच्या मालकीची ओमनी कार क्रमांक MH 15 BX 0658 या गाडीने पगारे कुटुंब देवदर्शनासाठी लासलगाव शहर व पिंपळगांव नाजीक ला जोडणाऱ्या शिवनदी वरील पुलावरून जात असताना या कारने अचानक पेट घेतला.कारने पेट घेतल्याचे लक्षात येताच चालकाने व कुटुंबातील इतर सदस्यांनी कारच्या बाहेर उडी घेऊन आपले प्राण वाचविले.कार ला आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिक युवकांनी मिळेल त्या ठिकाणाहून पाण्याच्या बादल्या आणून सदर आग विझवण्याचा प्रयत्न केला.

लासलगाव पोलिस ठाण्याचे पो उ नि लहानु धोक्रट,पोलिस कर्मचारी सागर आरोटे तत्काळ घटनास्थळी हजर झाले व पाण्याचा टँकर बोलावून आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.कारमध्ये आग कश्यामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *