जगाची दैनंदिन तेल, इंधन वाहतुकीची गरज 10 कोटी बॅरल्स एवढी आहे. त्यातील सुमारे 20 टक्के खनिज तेलाचा पुरवठा होमुर्झ सामुद्रधुनीतून होतो. होमुर्झ सामुद्रधुनीतून होणारा निम्म्याहून अधिक तेलसाठा भारत, चीन, जपान आणि दक्षिण कोरिया या देशांना होतो. तो तेल पुरवठा करण्यास अडथळा आल्यास या चार महत्त्वाच्या देशांचा तेल पुरवठा ठप्प होतो आणि त्या देशांच्या अर्थव्यवस्थांवर अनेक बाजूंनी ताण पडून त्या अर्थव्यवस्था सुरळीत करण्याची जबाबदारी त्या देशाच्या अर्थव्यवस्थापकांवर येऊन पडते. इतिहासात मागे वळून पाहिल्यास सन 1973 मध्ये योम किप्पूर युद्धात जगातील सर्व बाजारपेठा हादरल्या होत्या. सन 1978-79 मध्ये इराण क्रांतीच्या वेळी 50 ते 60 लाख बॅरल्सचा प्रतिदिन फटका बसत होता.
तर इराण-इराक युद्धात दररोज 40 लाख बॅरल्स तेलपुरवठ्याचा फटका बसून तेल वाहतूक ठप्प झाली होती. त्यावरून सध्या होमुर्झ सामुद्रधुनीतून होणारा दोन कोटी बॅरल्स प्रतिदिन तेलपुरवठ्याचा किती गंभीर परिणाम होत असेल, याची कल्पना केलेली बरी. भारताच्या दररोजच्या 52 ते 54 लाख बॅरल्स तेलपुरवठ्याचा मार्ग होमुर्झ सामुद्रधुनीतून होतो. युद्धापूर्वी सुमारे 21/22 लाख बॅरल्स तेलपुरवठा बहुतांशी होमुर्झ सामुद्रधुनीतून होत असे. त्यामुळे भारताची परिस्थिती किती चिंताजनक झाली असेल, यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार तेलाच्या किमती 10 टक्क्यांनी वाढल्यास महागाई वाढू शकते. विकासदर मंदावतो. सध्याच्या युद्धाचे चित्र पाहता इराणकडून बहरीनमधल्या रिफायनरीज कॉम्प्लेक्सवर हल्ले सुरू ठेवल्याने बहरीनच्या सरकारी कंपनीने त्यांच्या ऑपरेशन्सवर मेजर फोर्स लागू केले आहेत.
दरम्यान, अमेरिकेने 50 टक्के टॅरिफ 18 टक्क्यांपर्यंत कमी केल्यानंतर भारताला काहीसा दिलासा मिळाला आहे; पण तोही रशियाकडून तेल इंधन खरेदी न करण्याच्या अटींवर. परंतु मध्य-
पूर्वेतील युद्ध परिस्थितीत काही फरक पडेल असे वाटत नसल्याने तेलपुरवठा करणार्या कंपन्यांमधील करारांनुसार इंधन दरांत वाढ होण्याच्या शक्यता अधिक असून, एक-दोन दिवसांत तेलाच्या किमती प्रति बॅरल 110 डॉलर्सच्या वर गेल्या आहेत. याच कारणांनी इंधन दर आणि त्याचा पुरवठा यांच्यात मोठे फरक घडवून येतील, असे अंदाज वर्तवले जात आहेत. त्याचा परिणाम भारतीयांना इंधन खरेदी आणि महागाई यांचा मिलाफ करणे कठीण होऊन बसणार आहे.
An unprecedented crisis for the world due to the break in oil transportation!