ऋतुजा लटके यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा
मुंबई: अखेर अंधेरी पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने माघार घेतली, त्यामुळे ऋतुजा लटके यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे, रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या निवडणुकीसाठी ऋतुजा लटके आणि मुर्जी पटेल यांच्यामध्ये लढत होणार होती, मात्र काल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र पाठवून ही निवडणूक भाजपाने लढू नये अशी मागणी केली होती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही निवडणूक बिनविरोध करून महाराष्ट्राची संस्कृती व परंपरांची जपणूक करावी असे आवाहन केले होते आज सकाळी तानाजी सावंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चर्चा झाली त्यानंतर भाजपाने या जागेवरून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे ऋतुजा लटके यांचे विजयाची आता केवळ औपचारिकता शिल्लक राहिली आहे