कंटेनर-दुचाकीच्या धडकेत अंगणवाडी कार्यकर्ती ठार

लासलगाव : वार्ताहर
लासलगाव – टाकळी बायपास रोडवर अंबिका हॉटेलजवळ रविवारी (दि. 21) दुपारी टाटा कंटेनर व दुचाकी अपघातात पस्तीस वर्षीय अंगणवाडी कायर्र्कर्ती ठार झाली, तर दुचाकीचालक युवक गंभीर जखमी झाला.
सविस्तर माहिती अशी की रविवारी दुपारी 1.25 च्या
सुमारास टाटा कंटेनर (एमएच 46 सीएल 4030) व बजाज प्लॅटिना मोटारसायकल (एमएच 15 ईएम 1912) यांच्यात झालेल्या धडकेत दुचाकीचालक तुषार भाऊसाहेब पानगव्हाणे गंभीर जखमी झाला.
त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दुचाकीवर मागे बसलेली महिला गंगा ऊर्फ गायत्री हेमंत घायाळ (वय 35, रा. पाबळवाडी, ता. निफाड) हिच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक भास्करराव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार किशोर पवार तपास करीत आहेत.

Anganwadi worker killed in container-bike collision

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *