जमिनीच्या वादातून अंगणवाडी सेविकेस मारहाण
लासलगाव : प्रतिनिधी
निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथील अंगणवाडी सेविकेला जमिनीच्या वादातून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असून या प्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथे जमिनीच्या वादातून अंगणवाडी सेविकेस मारहाण केली तसेच मयूर रतन जाधव यासही रस्त्यात अडवून लाथाबुक्याने मारहाण झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असून लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालय येथे उपचार घेऊन पुढील उपचार घेण्यासाठी लासलगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
दरम्यान लासलगाव पोलीस स्टेशन मधील फिर्यादीवरून धारणगाव खडक येथील उज्वला नामक अंगणवाडी सेविका हीला दिनांक १ नोव्हेंबर २३ रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास मारहाण करण्यात आली.तसेच मयूर रतन जाधव यास बांधावर अँगल लावण्यासाठी जात असताना रस्त्यात अडवून लाथाबुक्याने मारहाण करण्यात आली.धारणगाव खडक येथील आरोपींना लवकरात लवकर शासनाने अटक करावी अशी मागणी करण्यात येत आहे.या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास लासलगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहे.