पैसे घेऊन तिकीट वाटल्याचा नाराजांचा आरोप

मंत्री गिरीश महाजन यांचे चौकशीचे आश्वासन

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल (दि. 30) अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत होती. दुपारी तीन वाजेपर्यंत मोठ्या नाट्यमय घडामोडींनी शहरभर चर्चा रंगल्याचे चित्र होते. भाजप या सत्ताधारी पक्षात 122 जागांसाठी जवळपास 1,200 जणांनी मुलाखती दिल्या होत्या; परंतु ऐनवेळी दि. 25 रोजी पोलीस बंदोबस्तात इतर पक्षांतील उमेदवारांच्या प्रवेशामुळे दुखावलेल्या भाजपच्या निष्ठावंतांनी पैसे घेतल्याचे आरोप करण्यात आले. एबी फॉर्म मिळविण्याच्या चढाओढीत सिनेस्टाइल थरारही अनुभवायला मिळाला.
एबी फॉॅर्मची पळवापळवी आणि अनेक निष्ठावंतांना डावलल्याने त्यांनी सत्ताधार्‍यांवर खापर फोेडत पैसे घेतल्याचे आरोप करण्यात आले. त्यावेळी गेल्या आठ दिवसांपासून नाशिकमध्ये तळ ठोेकून असलेले मंत्री गिरीश महाजन यांनी काही निर्णय ऐनवेळी बदलू शकतात. मात्र, मनासारखे झाले नाही म्हणून अंगावर यायचे, हातघार्ई करायचे, हे योग्य नाही. ही बाब प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालेन, असे सांगितले.
नाशिक महापालिकेत 122 जागा आहेत आणि इच्छुकांची संख्या हजारामध्ये होती. त्यामुळे काही ठिकाणी नाराजी होणारच आहे. तिकीट न मिळाल्याने काही कार्यकर्ते नाराज होतात. जुन्या 80 टक्के लोकांनाच तिकीट दिले आहे. नाशिकमध्ये जे झाले ते चुकीचे आहे. अनेक इच्छुक उमेदवार होते. त्यामुळे अनेकांना तिकीट हवे असे वाटत होते. त्यात एबी फॉर्म वाटप जिथे सुरू होते तिथे 100 ते 150 कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. सगळ्यांना पक्षाचे तिकीट हवे असते; परंतु जागा कमी आणि इच्छुकांची संख्या जास्त असल्याने हा गोंधळ झाला, असे सांगत याची चौकशी करू, असे विधान मंत्री महाजन यांनी केले.
नाशिक भाजप राड्याप्रकरणी महाजन म्हणाले की, एबी फॉर्म देताना जे घडले ते चुकीचे होते. कार्यकत्यार्ंनी जो गोंधळ घातला तो अयोग्य होता. या कार्यकर्त्यांना कुणी खतपाणी घातले याची चौकशी करून कारवाई करू. 122 तिकिटे आहेत; सगळ्याच कार्यकर्त्यांना तिकीट मिळत नाही. त्यात काही नवीन आलेले लोक आहेत. त्यांना डावलता येत नाही. ते अपेक्षेने पक्षात आलेले असतात. त्यामुळे हातघाईवर येण्याचा प्रकार चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले. मी आठ दिवसांपासून नाशिकमध्ये आहे. सगळ्यांशी बोलणे झाले. चर्चा करून निर्णय घेतले. काही निर्णय ऐनवेळी बदलू शकतात. परंतु मनासारखे झाले नाही म्हणून अंगावर यायचे, हातघाई करायची, हे योग्य नाही. ही बाब प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालेन, असे त्यांनी सांगितले.
तिकीटवाटपात कुठेही आर्थिक व्यवहार झाला नाही. जर कुणी असा आरोप करीत असेल तर त्याची चौकशी केली जाईल. एक कोटी असो वा पाच लाख, कुणाकडे माहिती असेल तर त्यांनी ती द्यावी. ज्यांना तिकीट मिळाले त्यांनाही तुम्ही कुणाला पैसे दिले का, अशी विचारणा करू. कोणी तुमच्याकडे पैसे मागितले का, असेही विचारू. याची सखोल चौकशी झाली पाहिजे. विनाकारण कोणी चुकीची माहिती पसरवू नये किंवा आरोप करू नये, असे सांगत महाजन यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या आरोपावर उत्तर दिले.
तिकीट कापले म्हणून आरोप होणार आहेत. आमच्याकडे तिकिटांची मागणी जास्त आहे. त्यात तिकीट मिळाले नाही म्हणून पैशांचा आरोप केला जात आहे. यावर नक्कीच चौकशी केली जाईल. बाहेरून अनेक लोक आपल्या पक्षात आले आहेत; परंतु आपण जुन्या लोकांना उमेदवारीत मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले आहे. त्यांनाही थोडेफार द्यावे लागणार आहे. 80 टक्के जुने लोक आणि 20 टक्के नवीन पक्षप्रवेश करणार्‍यांना तिकीट दिले आहे. पक्षाने तीन सर्व्हे केले आहेत. ते बघून जिंकून येण्याची क्षमता असणार्‍यांना उमेदवारी दिल्याचे महाजन यांनी सांगितले.

Angry people allege that tickets were distributed for money

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *