आता जनावरांची वाहतूक होणार सुरक्षित

आता जनावरांची वाहतूक होणार सुरक्षित
सिडको विशेष प्रतिनिधी
-भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान (DST) आणि त्यातील SEED विभागा मार्फत नवीन तंत्रज्ञान विकासनाचे मोलाचे कार्य केले जाते, ज्यात ग्रामीण भागातील जीवनमान उंचावण्यासाठी विविध संशोधन तसेच विविध लोक उपयोगी तंत्रज्ञान विकसित करण्यासंदर्भात विशेष प्रयत्न केले जातात. त्याच संशोधनाचा एक भाग म्हणून भारतातील जनावरांना ने आण करण्यात होणाऱ्या इजा आणि त्रासाचा विचार करून, उपलब्ध गाड्यांवर बसवता येणारे, कमी खर्चिक, चढ उतरण्यास सोपे असा पिंजरा जोडणी आणि दरवाजा (रॅम्प) गुरु गोबिंद सिंग इंजिनिअरिंग कॉलेज चे प्राध्यापक संदीप पाटील यांनी त्यांच्या संशोधन अभ्यासात तयार केला. ज्याचा उपयोग हा नक्कीच पुढील काळातील जनावरांच्या संरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने इतर वाहनावर जोडण्यासाठी होईल.
भारतात गुरांची वाहतूक प्रामुख्याने सामान्य मालवाहू वाहनांवर केली जाते, ज्यामध्ये गुरांना गाडीत चढवणे आणि उतरवणे (लोडिंग आणि अनलोडिंगसाठी) कोणतेही विशेष बदल केलेले नसतात. या साठी बाजार समितीत किव्हा गौशाळेत एखाद्या बांधलेल्या चौथऱ्याचा वापर करताना दिसतात, मात्र, अश्या गाडयांना शेतांमध्ये किंवा रस्त्याच्या आपत्कालीन परिस्थितींमध्ये मोठी अडचण ठरते, ज्यामुळे प्राण्यांना तणाव आणि संभाव्य दुखापती होऊ शकतात. या प्रकल्प अभ्यासाचा(प्रोजेक्टचा) उद्देश भारतातील शेतकरी आणि वाहतूकदारांच्या गरजे नुसार आणि गाडीच्या आकारा नुसार उभारू शकणारे (मॉड्युलर) आणि लवचिक पिंजरे(केज) तयार करणे आहे. यात गुरांच्या वाहतूकि साठी उघड झाप होऊ शकणारे आणि उतार असलेला दरवाज्याची (अडजस्टेबल रॅम्प) जोडणी करण्यात आली आहे, जे गुरांना गाडीत चढवण्याचा मार्ग (लोडिंग प्लॅटफॉर्म) म्हणून कार्य करते आणि वाहनासाठी सुरक्षित सुरक्षा दरवाजा म्हणूनही वापरले जाऊ शकते. समन्व्ययांकानी आपल्या वडिलांप्रतीच्या कृतज्ञतेतून ह्या पहिल्या प्रयत्नास “सुभाष गौसेवा वाहन” असे नाव दिले.
गुरुगोविंद सिंग अभियांत्रीकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नीलकंठ निकम यांनी ह्या प्रक्लपातील विशेष बाबींचा उल्लेख करून समन्वयक प्रा. संदीप पाटील यांचे कौतुक केले आणि पुढील संशोधनास प्रेरणा दिली. गुरुगोविंद सिंग फाउंडेशनचे अध्यक्ष सरदार बलबीरसिंग छाब्रा, उपाध्यक्ष हर्जित आनंद, सचिव स. कुलजितसिंग बिर्दी आणि सर्व कार्यकारी सभासद यांनी ह्या प्रकल्पाची प्रात्यक्षिकरित्या माहिती घेऊन असे प्रकल्प आणि संशोधन पुढे चालावे या करता प्रोत्साहित केले. हा प्रकल्प यशस्वीपने पूर्ण करताना होणाऱ्या सह्कार्या बद्दल समन्वयक पाटील यांनी फौंडेशनचे सर्व सभासद, प्राचार्य  डॉ निकम , सर्व कर्मचारी आणि शिक्षकांचे आभार मानले.
Gavkari Admin

Recent Posts

नाशिकरोडला डॉ. आंबेडकर यांची जयंती उत्साहात

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…

19 hours ago

सिन्नर तालुक्यात अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम

शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर  प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…

20 hours ago

शहरात पाण्याच्या टँकरची संख्या वाढली

80 फेर्‍या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…

20 hours ago

काठे गल्लीतील ते अनधिकृत स्थळ हटवले

सिडको : विशेष प्रतिनिधी -मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काठे गल्लीतील अनधिकृत स्थळ महापालिका…

22 hours ago

अवघ्या दीड महिन्यातच हेमलता पाटील यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

नाशिक: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तिकीट न दिल्यामुळे नाराज झालेल्या कॉंग्रेस प्रदेश प्रवक्त्या हेमलता पाटील…

2 days ago

मनमाडला कांदे ट्रॅक्टरमध्ये भरताना शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू

मनमाडला रेल्वे कर्मचाऱ्याचा कांदे भरत असतांना शॉक लागून मृत्यू मनमाड : प्रतिनिधी मनमाडनजीक असलेल्या नागापूर…

2 days ago