खरातविरोधात आणखी गुन्हा, शहरातील डॉक्टरही रडारवर

सिडको : प्रतिनिधी
नाशिकमधील महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणात अटकेत असलेला मुख्य संशयित भोंदू अशोक खरात याच्या चौकशीत दररोज नवे आणि गंभीर खुलासे समोर येत आहेत. एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीकडून त्याची सखोल चौकशी सुरू आहे. तपासाचा व्याप आता वैद्यकीय क्षेत्रापर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, भोंदू अशोक खरात याच्याविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आतापर्यंत खरातच्या विरोधात 11 गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यांच्या संख्येत अजूनही वाढ होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे
भोंदू अशोक खरातला नाशिक सत्र न्यायालयाने रविवारी (दि. 29) तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. ही कोठडी आज (दि. 1 एप्रिल) संपत असल्याने, त्याआधी अधिकाधिक ठोस पुरावे गोळा करण्यावर एसआयटीचा भर आहे. चौकशीदरम्यान, कोणतीही महिला गर्भवती होऊ नये यासाठी खरातने गर्भनिरोधक औषधांचा वापर केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर, संबंधित औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने देण्यात येत होती का, याची तपासणी पोलीस करत आहेत.त्यामुळे भोंदू अशोक खरात कोण डॉक्टर मदत करत होते का? या दृष्टीने पोलीसांनी चौकशीची सूत्रे फिरविल्यामुळे आता नाशिकच्या वैद्यकीय क्षेत्राकडेही पोलिसांची वक्रदृष्टी पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच, महिलांवर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा त्यांना संमोहित करण्यासाठी काही विशिष्ट औषधांचा वापर करण्यात आला होता का, याबाबतही संशय व्यक्त होत आहे. या औषधांचा पुरवठा नेमका कुठून झाला आणि त्यामागे कोणते क्लिनिक किंवा रुग्णालय जोडलेले आहे का, यावर तपास यंत्रणांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. या घडामोडींमुळे नाशिकमधील काही नामांकित डॉक्टर आणि वैद्यकीय संस्थांवर संशयाची सुई फिरू लागली असून, संबंधित क्षेत्रातही खळबळ उडाली आहे. उद्या न्यायालयात एसआयटीकडून या संदर्भातील काही गंभीर बाबी मांडल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Another crime against Kharat, city doctors also on radar

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *